शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर निवडणुकीच्या मतदान टक्केवारीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:58 IST

प्रशिक्षणास निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले ८० टक्के कर्मचारी उपस्थित होते.

ठळक मुद्देपदवीधर निवडणूक मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण 

परभणी : मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे मतदान १ डिसेंबर रोजी होत असून, या प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी  मतदानाच्या टक्केवारी विकसित केलेल्या स्वतंत्र सॉफ्टवेअरचेही प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात १२ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद  विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीअंतर्गत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, औरंगाबाद येथील उपायुक्त रश्मी खांडेकर, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, सुनील पोटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. तेव्हा या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली. मतदान केंद्र तयार करणे, मतदानाच्या दिवशी मतपेटी कशा प्रकारे तयार करायची, मतदान सुरू झाल्याचा अहवाल, संवैधानिक आणि असंवैधानिक लिफाफ्यामध्ये माहिती कशा प्रकारे भरावी, कोणते लिफाफे सील करायचे, प्रत्येक दोन तासांनी मतदानाची टक्केवारी कशी काढायची याविषयी माहिती दिली. मतदानाची टक्केवारी उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर मतदान केंद्राध्यक्षांसाठी तयार करण्यात आले आहे. त्याचेही प्रात्याक्षिक यावेळी दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे आदर्श मतदान केंद्र कसे तयार करावे, मतदान पूर्व तयारीचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. या प्रशिक्षणाच्या वेळी सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते. 

मतपेटीच्या वापराचे प्रशिक्षणही निवडणूक ईव्हीएमच्या साह्याने न घेता मतपत्रिकांच्या साह्याने घेतली जाणार आहे. त्यामुळे जम्बो मतपेटीचा वापर कसा करायचा, सिलिंग कार्यपद्धती या विषयीची माहिती यावेळी देण्यात आली.  या प्रशिक्षणास निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले ८० टक्के कर्मचारी उपस्थित होते. जे कर्मचारी अनुपस्थित होते, त्यांना नोटीस पाठिवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकparabhaniपरभणीMarathwadaमराठवाडाVotingमतदान