रोहयोची कामे सुरू करा
देवगाव फाटा : सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात मजुरांना हाताला काम मिळावे, यासाठी रोहयोची कामे सुरू करणे गरजेचे आहे. तालुक्यात आनेक ठिकाणी विविध कामांना मंजुरी मिळाली असून, नियोजनाअभावी कामे खोळंबली आहेत.
कर्जमुक्ती योजनांपासून अनेक वंचित
देवगाव फाटा :आधार लिंक व तांत्रिक कारणांमुळे सेलू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला नाही. यामुळे लाभार्थी शेतकरी यांच्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.
सुंदर कार्यालय मोहीम कधी राबवणार
देवगाव फाटा : माझे कार्यालय सुंदर कार्यालय ही मोहीम प्रशासनाने सुरू केली असली तरी सेलू तालुक्यात बहुतांश कार्यालयात ही मोहीम अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे ही मोहीम कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विकास कामावरील बंधणे हटली!
देवगाव फाटा : सेलू तालुक्यातील ६७ ग्रा.पं.ची मुदत संपल्यानंतर तेथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकाची नियुक्ती केली गेली. यामुळे आर्थिक विकास कामे विस्कळीत झाली, त्यानंतर निवडणूक आचारसंहिता आली. निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपल्याने विकास कामांवरील बंधणे हटली. आता सरपंच निवड होताच विकास कामाला मुहूर्त लागणार, अशी चर्चा आहे.