शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

झेंडूच्या शेतीतून दोन महिन्यांत दीड लाख रुपयांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 05:12 IST

शेतीवाडी : बोरगव्हाण येथील शेतकऱ्याचा आदर्श

 लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी  (जि. परभणी) : ‘विकेल तर पिकेल’ या संकल्पनेतून पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील एका २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने झेंडूच्या शेतीतून सव्वादोन महिन्यांत १ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे शेत बांधावरुनच थेट बाजारपेठेत स्वत: फुलं विक्री करुन शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील शेतकरी वैभव भगवानराव खुडे हा बी.कॉम. द्वितीय वर्षात शिक्षण घेतो. वडिलोपार्जित शेतीला मदत करुन तो शेतीत वेगवेगळे प्रयोग करतो. वैभवकडे बागायती १० एकर शेती आहे. यात मागील अनेक वर्षापासून वडील पारंपारिक पिके घेतात. मात्र पिकांवर केेलेला खर्चही उत्पादनातून निघत नाही. त्यामुळे वैभव याने पारंपारिक पिकाला फाटा देत झेंडूची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५ सप्टेंबर २०२० रोजी १० गुंठे क्षेत्रावर ४ बाय २ अंतरावर कलकत्ता झेंडू वाणाच्या १३०० रोपांची लागवड केली. त्यानंतर अवघ्या १० हजार रुपयांच्या खर्चावर सव्वा दोन महिन्यात हे पीक बाजारात विक्री करण्यासाठी तयार झाले. 

दसरा सणाच्या पूर्वसंध्येला त्याच्या शेतातून व्यापाऱ्याने करार करुन जागेवरच ८० रुपये किलो दराने झेंडूची खरेदी केली. १० क्विंटल फुले निघाल्याने वैभवला ८० हजार रुपयांचे उत्पन्न पदरात  पडले. 

पाथरीत स्टॉल लावून केली विक्रीnशुक्रवार व शनिवार या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वैभव खुडे याने पाथरी शहरातील बाजारात स्टॉल लावून झेंडूची विक्री केली. ६ क्विंटल फुलांची विक्री करुन प्रति किलो १४० ते दीडशे रुपयांचा भाव घेत ८५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. त्यामुळे झेंडूच्या शेतीतून अडीच महिन्यात दीड लाख रुपयांचा नफा या शेतकऱ्याने मिळविला आहे.