शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी तालुक्यात सतराशे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 16:59 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी 36 हजार 933 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील तब्बल 1 हजार 674 अर्ज तालुका स्तरीय छाननी समितीने अपात्र ठरविले आहेत. 

पाथरी (परभणी ) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी 36 हजार 933 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील तब्बल 1 हजार 674 अर्ज तालुका स्तरीय छाननी समितीने अपात्र ठरविले आहेत. 

राज्य शासनाने 2017 या वर्षात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. प्रत्येक खातेदारांना दीड लाख रुपये पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय ही झाला, त्या साठी खातेदार शेतकऱ्यांकडून पतीपत्नी चे खाते ऑनलाइन अपलोड करून घेतली, खाते ऑनलाइन करताना शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

पाथरी तालुक्यात 56 गावात 36 हजार 933 शेतकऱ्यांनी विविध बँका मार्फत घेतलेल्या कर्जाची खाते ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. ऑनलाइन नोंदणी नंतर याद्या ग्रीन लिस्ट म्हणून शासनाने संबंधित बँकांकडे सादर केल्या. त्या याद्यांचा घोळ मागील काही महिन्यांपासून सुरूच आहे. या अर्जाबाबत बँकांनी दिलेली माहिती आणि ऑनलाइन माहिती याचा बँक स्तरावर ताळमेळ बसविण्यात येऊन याचा अहवाल सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे दाखल झाला होता.यानुसार दाखल अर्जांपैकी 1 हजार 674 खाते अपात्र ठरले आहेत.

तालुकास्तरीय समितीराज्य शासनाने कर्जमाफी संदर्भात सहायक निबंधक यांच्या अधेक्षतेखाली तालुका स्तरीय छाननी समिती गठीत केली होती, या समितीत तालुका लेखा परीक्षक , आणि संबंधित बँकांचे क्षेत्रीय अधिकारी यांचा सामावेश आहे, या समिती कडे पाथरी तालुक्यातील 9 बँकेतील खातेदर यांचा त्रुटीतील आवाहल सादर करण्यात आला होता

जिल्हा समितीकडे अपील करता येईलतालुका स्तरीय समितीने छाननीत अपात्र ठरलेल्या खातेदारांना जिल्हास्तरीय समितीकडे अपील करता येईल - दिलीप गौडर, सहायक निबंधक सेलू 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँकparabhaniपरभणी