शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणी जिल्ह्यात जन्मदरातील तफावत वाढली; सहा वर्षांत सरासरी हजार मुलांमागे केवळ ८७८ मुली

By मारोती जुंबडे | Updated: December 5, 2023 18:10 IST

२०१७ पासून २०२२ या सहा वर्षांचा विचार केला तर मुलींचे प्रमाण १ हजारांमागे सरासरी ८७८ एवढे आहे.

परभणी :  जिल्ह्यामध्ये मुले आणि मुली यांच्या जन्मदरामध्ये मोठा फरक आहे. २०१७ पासून २०२२ या सहा वर्षांचा विचार केला तर मुलींचे प्रमाण १ हजारांमागे सरासरी ८७८ एवढे आहे. त्यामुळे भविष्यात आमच्या मुलाला लग्नासाठी मुलगी देता का मुलगी अशी स्थिती दिसून येणार आहे. या जन्मदरातील तफावत दूर करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. 

जिल्ह्यात २०१० मध्ये मुलींचा जन्मदर हा १ हजार मुलांमध्ये ८७६ एवढा होता. २०१६ मध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ होवून १ हजार मुलांमध्ये ९४२ मुलींचा जन्म झाल्याची नोंद आहे.२०२१ मध्ये हा जन्मदर ९९३ वर पोहचला. अशी स्थिती कायम राहणे आवश्यक होते. मात्र तसे होताना दिसून येत नाही. २०२२ मध्ये घसरण झाली.

बेटी बचाओं बेटी पढाओ प्रभाव दिसेना...आरोग्य विभागासह प्रशासनाकडून मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृवंदन योजनाही मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचे दिसून येत आहे.

शहरात दहा महिन्यात १७०० जन्म  परभणी शहरात मागील १० महिन्याच्या मनपाच्या जन्म विभागाकडे नोंद झालेल्या आकडेवारीनुसार १०५७ मुलांचा तर ६८६ मुलींचा जन्म झाला असल्याची नोंद आहे.

बालमृत्यू कमी करण्यावर भरगर्भधारणा कालावधीत वेळेवर न घेतले जाणारे उपचार, सकस आहाराकडे होणारे दुर्लक्ष, बालकांच्या जन्मानंतर घेतली न जाणारी काळजी, लसीकरणाकडे मातांचे होणारे दुर्लक्ष, कुपोषण यासह इतर विविध कारणांनी जिल्ह्यात बाल मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गत वर्षभरात १०१ बालकांचा मृत्यू झाला असून, जग पाहण्याआधीच हे बालक देवाघरी गेले आहेत; मात्र २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये १८ बालमृत्यू कमी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाला बालमृत्यू रोखण्यात कुठेतरी यश येताना दिसून येत आहे.

वर्षभरात १०१ बालमृत्यूजानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात ११९ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या वर्षभराच्या कालावधीत १०१ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या तुलनेत १८ ने बालमृत्यू कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे काम यशस्वी होताना दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी