शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच मिळणार अग्रीम रक्कम 

By मारोती जुंबडे | Updated: September 10, 2022 16:07 IST

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाने सतत २१ दिवस खंड दिल्याने बहरात असलेल्या सोयाबीन पिकाला निसर्गाच्या व कृपेचा मोठा फटका बसला.

परभणी: ऑगस्ट महिन्यात सतत २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील आठ मंडळातील सोयाबीनच्या उत्पादनात जवळपास ५० ते ५७ पर्यंत घट अपेक्षित आहे. त्यामुळे  पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील केवळ आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ९ सप्टेंबर रोजी पिक विमा कंपनीला दिले आहेत.

खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस, उडीद, तूर, मूग आदी पिकांची पेरणी केली आहे. जून महिना पूर्णतः कोरडा गेल्याने जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने खरीपातील पिके चांगलीच बहरली. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाने सतत २१ दिवस खंड दिल्याने बहरात असलेल्या सोयाबीन पिकाला निसर्गाच्या व कृपेचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सोयाबीन पिकाच्या पीक परिस्थितीचा अहवाल, प्रजन्यमान अहवाल, स्थानिक प्रसारमाध्यमांचा बातम्या, दुष्काळ सदस्य परिस्थिती या आधारे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा कमी आहे, असे जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात निदर्शनास आल्यामुळे हे महसूल मंडळ नुकसान भरपाईस पात्र असल्याचे स्पष्ट केले.

त्यामुळे सोयाबीनच्या संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आग्रीम रक्कम पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला आदेशित करण्यात आले आहे. ही रक्कम अधिसूचना जाहीर झाल्यापासून विविध मुदतीत सांभाव्य नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी विमा कंपनीला दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी केवळ आठ मंडळातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत २५ टक्के अग्रीम रक्कम मिळणार आहे.

या मंडळांचा समावेश सतत २१ दिवस पावसाचा खंड झाल्याने जिल्ह्यातील आठ मंडळात ५२ ते ५७ टक्क्यापर्यंत सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट आली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील झरी, शिंगणापूर, जांब व गंगाखेड तालुक्यातील माखणी, पूर्णा तालुक्यातील चुडावा, मानवत तालुक्यातील रामपुरी, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ तर जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळाचा समावेश आहे. या मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रकमेचा महिनाभरात लाभ मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी