शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात विकसित रोगप्रतिकारक, लवकर येणाऱ्या ७ वाणांची शिफारस

By मारोती जुंबडे | Updated: February 9, 2024 13:34 IST

राज्य बियाणे उपसमितीची बैठक; शेती पिकांचे पाच, भाजीपाल्याच्या दोन वाणाचा समावेश

परभणी: राज्य बियाणे उपसमितीची ५३ वी बैठक ८ फेब्रुवारी रोजी राज्याचे अप्पर मुख्य सचिव (कृषि) अनुप कूमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या शेती पिकांचे पाच वाण आणि भाजीपाला पिकांचे दोन वाण अशा एकूण सात वाणास केंद्रीय बियाणे समिती यांना अधिसूचित करण्याची शिफारस करण्यात आली. 

या सात वाणात सोयाबीनचे एमएयुएस ७३१, अमेरिकन कापूसाच्या एनएच ६७७, हरभरा देशी वाण परभणी चना १६, खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती, तीळ पीकाच्या टिएलटी १० तसेच मिरचीचा पीबीएनसी १७ व टोमॅटोचा सरळ वाण पीबीएनटी २० याचा समावेश आहे. सोयाबीनचा एमएयुएस ७३१ हा वाण अधिक उत्पन्न देणारा (हेक्टरी २८ - ३२ क्विंटल) असून विविध कीड रोगास मध्यम प्रतिकारक, लवकर येणारा, मराठवाडा विभागासाठी लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.

अमेरिकन कापूस प्रसारित वाण एनएच ६७७ यांचे जिराईत मधील उत्पादन क्षमता हेक्टरी १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टर काढणीचा कालावधी १५० ते १६० दिवस आहे, हा वाण जिवाणूजन्य तसेच बुरशीजन्य रोग व रस शोषणाऱ्या किडीस प्रतिकारक आहे. हे वाण महाराष्ट्र राज्यातील कोरडवाहु कापूस लागवड असलेल्या भागासाठी शिफारसीत करण्यात आला आहे. हे वाण बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी उपयूक्त ठरणार आहेत. हे सात वाण प्रसारण करण्यासाठी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व विद्यापीठातील पीक पैदासकारांचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी सत्कार केला.

परभणी चना १६हरभरा देशी वाण हा अधिक उत्पन्न देणारा, मर रोगास प्रतिकारक, यांञिकीसाठी सुलभ, टपोऱ्या दाण्याचा, मराठवाडा विभागासाठी शिफारसीत करण्यात आला आहे.

टिएलटी १०तीळ पीकात हा अधिक उत्पन्न देणारा टपोरा पांढरा दाणा, महत्वाच्या किड व रोगास मध्यम प्रतिकारक असुन महाराष्ट्रासाठी खरीप व उन्हाळी हंगामास लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.

परभणी शक्तीज्वारीचा खरीप हंगामातील परभणी शक्ती हा वाण धान्यामध्ये अधिक लोह (४२ मिली ग्रॅम / किलो) व अधिक जस्त (२५ मिली ग्रॅम / किलो) असणारा व धान्याचे उत्पादन २२ ते २५ Ïक्वटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता आहे. कडब्याचे ५२ ते ५५ क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता असणारा वाण महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामात लागवडीची शिफारस करण्यात आला आहे.

मिरची पीबीएनसी १७ मिरचीचा पीबीएनसी १७ हा वाण हिरवी मिरचीचे अधिक उत्पादन देणारा ५३१ ते ५४६ क्विंटल प्रति हेक्टर, मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. हा वाण लिफकर्ल व अॅथ्राकनोझ रोगास मध्यम सहनशील आहे.

पीबीएनटी २० टोमॅटोचा सरळ वाण पीबीएनटी २० हा वाण रब्बी हंगामामध्ये मराठवाडा विभागास लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. या वाणाची उत्पादन क्षमता ६१४ ते ६२० क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. या वाणाच्या फळाचा आकार गोल व गडद्द लाल रंग असुन प्रति फळाचे वजन ६० ते ६५ ग्रॅम आहे. लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी फळाची पहिली काढणीस येते. हा वाण लिफकर्ल व फळामधील अळी, पांढरी माशी व फुल किडे या किडीस मध्यम सहनशील आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठparabhaniपरभणी