शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी बसस्थानकात हिरकणी कक्ष अडगळीत; अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे महिलांची कुचंबणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 19:01 IST

येथील बसस्थानकावर काही वर्षांपूर्वी निर्माण केलेला हिरकणी कक्ष सध्या अडगळीत पडला असून, महिला प्रवाशांची यामुळे कुचंबणा होत आहे़ हिरकणी कक्षाची उभारणी करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ 

परभणी :  येथील बसस्थानकावर काही वर्षांपूर्वी निर्माण केलेला हिरकणी कक्ष सध्या अडगळीत पडला असून, महिला प्रवाशांची यामुळे कुचंबणा होत आहे़ हिरकणी कक्षाची उभारणी करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़ 

बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी कक्ष उभारण्याचे धोरण शासनाने आखले होते़ सार्वजनिक ठिकाणी महिलांची कुचंबणा होऊ नये, त्यांना बसण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा कक्ष उभारण्यात आला़ मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे महिला कक्षांकडे डोळेझाक झाली़ काही वर्षांपूर्वी सुरू झालेले हे कक्ष आता केवळ फलकापुरते शिल्लक राहिले आहे़ परभणी येथील बसस्थानकावर महिलांसाठी उभारण्यात आलेल्या कक्षाला हिरकणी कक्ष असे नामकरण करून हा कक्ष सुरू करण्यात आला़ बसस्थानकातील स्थानकप्रमुखांच्या कक्षाशेजारी हा हिरकणी कक्ष निर्माण केला होता़ मात्र त्या ठिकाणी नियमित स्वच्छता, पाण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याने या कक्षाचा वापर झाला नाही़ कालांतराने या कक्षाला कायमस्वरुपी कुलूप ठोकण्यात आले़ 

बसस्थानकावर हिरकणी कक्ष कायम बंद असल्याची बाब समोर आल्यानंतर याबाबत ओरडही झाली़ त्यामुळे विभागीय नियंत्रक कार्यालयातील तत्कालीन विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी परभणी बसस्थानकावर सुसज्ज असा हिरकणी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला़ बसस्थानकाच्या प्रवेशद्वारालगतच उजव्या बाजूला हा कक्ष सुरू करण्यात आला़ त्यामुळे स्थानकावर येणार्‍या महिला प्रवाशांची गैरसोय दूर झाली, असे वाटत असतानाच काही महिन्यांतच या ठिकाणचा कक्षही गुंडाळण्यात आला असून, आता त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे़ 

स्थानकावर अद्ययावत पोलीस चौकी उभारण्याची कार्यवाही स्वागतार्ह असली तरी हिरकणी कक्षासाठी देखील नियोजन करणे अपेक्षित होते़ मात्र महामंडळाचे याकडे साफ दुर्लक्ष झाले़ हिरकणी कक्षाकडे प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे़ तेव्हा स्थानकावर हा कक्ष नव्याने सुरू करावा व त्या ठिकाणी वीज, पाणी व आसन व्यवस्था उभारावी, अशी मागणी होत आहे़ 

शासकीय कार्यालयातही  हीच अवस्थापरभणी जिल्ह्याचे मुख्य कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातही महिला कक्ष उभारण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याचेच दिसत आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या कक्षासाठी स्वतंत्र जागाही निश्चित केली आहे़ परंतु, या जागेत सैनिकी कल्याण कार्यालय सुरू करण्यता आले़ त्यामुळे महिलांना थांबण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच जागा उपलब्ध नाही़ या कार्यालयात अनेक महिला अधिकारी, कर्मचारी आहेत़ दुपारच्या सुटीच्या वेळी या महिलांची मोठी गैरसोय होते़ या ठिकाणी महिलांचा कक्ष उभारावा, अशी मागणी परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने महिनाभरापूर्वीच केली होती़ परंतु, अद्यापपर्यंत त्यावरही कारवाई झालेली नाही़ अशीच परिस्थिती इतर शासकीय कार्यालयांमध्येही पहावयास मिळत आहे़ 

तालुक्यांच्या ठिकाणीही दिला फाटापरभणी जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, सेलू, गंगाखेड आणि परभणी असे पाच आगार आहेत़ प्रत्येक आगाराच्या ठिकाणी हिरकणी कक्ष उभारणे अपेक्षित आहे़ जिल्ह्याच्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या हिरकणी कक्षाचीच अवस्था वाईट झाली आहे़ तालुक्याच्या ठिकाणी तर हे कक्ष उभारण्यातही आले नाहीत़ महिला प्रवाशांकडून अशा कक्षा संदर्भात पाठपुरावा होत नाही़ तसेच कोणी ओरडही करीत नसल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे़ परभणी येथील स्थानिक महामंडळ प्रशासनाने परभणीसह इतर आगारांमध्येही प्राधान्याने हिरकणी कक्ष सुरू करावेत, अशी मागणी होत  आहे.