शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता मोहिमेत तंत्रज्ञानाची मदत, सोनपेठ नगरपालिका करणार 'स्वच्छता मोबाईल अ‍ॅप' चा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:30 IST

सोनपेठ नगरपालिकेने शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यात आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. यानुसार आता शहरात साचलेला कचरा, दुर्गंधी याबाबत तक्रार करण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता अ‍ॅप उपलब्ध झाले आहे. याचा वापर करून नागरिकांना घरबसल्या नगर परिषदेकडे तक्रार करता येणार आहे.

परभणी : सोनपेठ नगरपालिकेने शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यात आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. यानुसार आता शहरात साचलेला कचरा, दुर्गंधी याबाबत तक्रार करण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता अ‍ॅप उपलब्ध झाले आहे. याचा वापर करून नागरिकांना घरबसल्या नगर परिषदेकडे तक्रार करता येणार आहे.

सध्या सोनपेठ नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यासाठी कर्मचारी कार्यरत आहेत तरीही वाढत चाललेल्या शहराच्या व्यापामुळे कचरा व दुर्गंधीच्या समस्या वाढत आहेत. अनेक वेळा कचरा उचलण्यास दिरंगाई होते़ याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही़ यावर केंद्र शासनाने स्वतंत्र स्वच्छता अ‍ॅप तयार केला आहे. हा उपक्रम सोनपेठ नगरपालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे़ या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या भागातील साचलेला कचरा, दुर्गंधी याचा फोटो काढून या अ‍ॅपमध्ये अपलोड करता येणार आहे़ अपलोड झालेले फोटो अ‍ॅपचे नियंत्रण करणा-या नगर परिषदेच्या टीमला उपलब्ध होणार आहे.

तसेच तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोन-तीन दिवसानंतर या तक्रारींचे निवारण झाले की नाही याचाही आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे शहरातील कचरा उचलण्यास मदत होणार आहे़ नगरपालिकेने तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एम.बी. पवार व सचिन पोरे या दोघांची नियुक्ती केली आहे. मृत जनावरे, साचलेला कचरा, अस्वच्छ परिसर, सार्वजनिक शौचालयाच्या तक्रारीही यावर करता येणार आहेत़ त्यामुळे शहर स्वच्छ होण्यास मदत होणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे़

असे करा अ‍ॅप डाऊनलोड नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या स्मार्ट फोनमधील प्लेस्टोअरमध्ये जाऊन स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करावा लागणार आहे़ त्यानंतर भाषा निवडून स्वत:चा मोबाईल नंबर  टाकावा लागणार आहे़ त्यानंतर मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर पासवर्ड विचारलेल्या ठिकाणी ओटीपी टाकून स्वच्छता अ‍ॅप घेता येणार आहे़ अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर तुमची तक्रार नोंदविता येणार आहे़ यामध्ये छायाचित्र घेण्यासाठी पर्याय असून, त्याखालीच ठिकाणही टाकावे लागणार आहे़ त्याखाली जीपीएस सिस्टीमचे चिन्ह आल्यानंतर हे चिन्ह सलेक्ट करावे लागणार आहे़ ही पोस्ट नगरपालिकेच्या सिस्टीमला जोडली जाणार असून, नियुक्त टीमला केलेली तक्रार दिसणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी