शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूरजवळ भीषण अपघात; अकोली पुलावर भरधाव ट्रकने तिघां भावांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 13:01 IST

दोन सख्ख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू

जिंतूर ( परभणी ) : स्वतःच्या दुकानावर जात असताना अचानक भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलवरील तिघा भावांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील अकोली पुलावर घडली. अभिषेक काशीनाथ म्हेत्रे (१८ ), योगेश काशिनाथ म्हेत्रे ( १५ ), रामप्रसाद विश्वनाथ मेहेत्रे ( २० ) अशी मृतांची नावे आहेत. मृतातील दोघे सख्खे तर एक चुलत भाऊ होता. जिंतूरपासून चार किलोमीटर अंतरावरील अकोली गावाच्या पुलाजवळ असणारा खड्डा चुकवताना हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. 

मालेगाव येथील अभिषेक, योगेश आणि रामप्रसाद हे तिघे भाऊ आज सकाळी जिंतूरमधील भाजीमंडीमध्ये असणाऱ्या स्वतःच्या किराणा दुकानावर दुचाकीवरून (एम एस 26- 2834 ) जात होते. जिंतूरपासून अवघ्या ४ किलोमीटरवर असलेल्या अकोलीजवळील उड्डाण पुलावर समोरून येणाऱ्या ट्रकने  ( एम एच18 -बि जि 6270) दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकखाली आल्याने तिन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघात ऐवढा भीषण होता की, त्याठिकाणी हाडामासाचा सडा पडला होता. 

अपघातानंतर अकोली गावातील ग्रामस्थांनी या संदर्भातली माहिती जिंतूर पोलिसांना दिली. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक दीपक शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी भेट देऊन देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ आकात, पांडुरंग मुसळे ,तुकाराम शेटे, ज्ञानेश्वर पांचाळ, रुग्णवाहिका चालक घुगे यांनी मृतदेह रुग्णालयात आणण्यासाठी मदत केली. 

खड्डा चुकवताना झाला अपघात?अकोली पुलाजवळ मोठा खड्डा आहे. हा खड्डा चुकवताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघे खाली पडले आणि याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या मार्गावर खड्डे आणि गरोधक यांमुळे आतापर्यंत ८ जणांचा बळी गेले आहेत. यामुळे या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार हेच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणी