शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

थोडा धीर धरायला हवा होता, निकालाच्या धास्तीने आयुष्य संपवलेली संयुक्ता बारावीत पास

By मारोती जुंबडे | Updated: May 26, 2023 16:10 IST

संयुक्ता निकालात पास; पण आयुष्यात नापास

सेलू : आपल्या सोबतचे विद्यार्थी बारावी परीक्षेत पास होतील. मात्र आपण नापास होणार या भितीने सेलू येथील एका विद्यार्थ्यांनीने निकालाच्या आदल्या दिवशी गळफास घेत जीवन संपविले. या टोकाच्या पावलाने संयुक्ता आयुष्याचा डाव हारली. ही बाब शैक्षणिक परिघात आत्मचिंतनीय ठरत आहे. संयुक्ता बालाजी उबाळे (शाहु नगर,सेलू) असे गळफास घेऊन मृत्यू पावलेल्या युवतीचे नाव आहे.

बालाजी उबाळे हे मुळचे जवळा बाजार (जि.हिंगोली) येथील असुन १० वर्षापासून ते सेलू येथे शाहुनगरात स्थाईक झाले. एक थोरली मुलगी बीसीए शिक्षण घेत आहे. तर संयुक्ता हिने नुतन महाविद्यालय सेलू येथे १२ वी वाणीज्यची परिक्षा दिली होती.परिक्षेदरम्यान तीची तब्येत ठिक नसल्याने तीला सलाईन लावावे लागले होते. परिक्षेनंतर मी नापास होणार हे शल्य तीला बोचत होते. वडील खाजगी कामासाठी लातूर येथे राहत होते. आई व दोन बहिणी सेलू येथे शाहू नगर भागात राहत असत. २४ मे रोजी संयुक्ता ही एकटीच घरी होती.२५ मे रोजी बारावीचा निकाल लागणार होता. अखेर नापास होण्याच्या चिंतेने तिने बुधवारी दुपारी ५ ते रात्री ८ या वेळेत गळफास घेऊन संयूक्ताने जीवन संपवीले. हा प्रकार आई घरी आल्यानंतर पुढे आला. त्यानंतर बालाजी महादेव उबाळे (शाहु नगर ,सेलू) यांनी सेलू पोलीस ठाण्यात खबर दिली की,२४ मे रोजी दुपारी ५ ते रात्री ८ या वेळेत माझी मुलगी संयुक्ता बालाजी उबाळे (१७) हीने बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भितीने मानसिक ताण घेत राहत्या घराच्या छताला लावलेल्या फॅनला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सपोउपनी व्हि.के.राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सेलू उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे.

थोडा धीर धरायला हवा होता...गुरूवारी १२ वी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये मृत्यू पावलेली संयुक्ता बालाजी उबाळे हिला ५२ टक्के गुण मिळवत ती पास झाली. कदाचित तीने आगोदर निकाल बघू नंतर काय ते ठरवू असा निर्णय घेतला असता तर संयुक्ताची आत्महत्या टळली असती, असे जड अंतकरणाने नातेवाईक सांगत होते. दरम्यान, विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याची गरज असलेला मतप्रवाह येथे व्यक्त होत होता.

टॅग्स :examपरीक्षाHSC Exam Resultबारावी निकालparabhaniपरभणी