शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत कोरोनाचा कहर : तपासण्या कमी; मृत्यूदर सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 19:15 IST

चाचण्यांमध्ये मराठवाड्यात परभणी जिल्हा सर्वात शेवटच्या स्थानावर आहे़ 

ठळक मुद्देआतापर्यंत जिल्ह्यात फक्त १८ हजार ५४० जणांच्या तपासण्यापरभणी जिल्ह्याचा मृत्यूदर ४़४५ टक्के

परभणी : सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना या आजाराचा फैलाव रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोरोना संशयितांच्या तपासण्या करण्याचे परभणी जिल्ह्याचे प्रमाण मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत सर्वात कमी आहे़ तर कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा दर मात्र सर्वाधिक असल्याची बाब समोर आली आहे़ 

जिल्हा प्रशासनाने ३ सप्टेंबर रोजी शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात फक्त १८ हजार ५४० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत़ त्यातील २ हजार ७६७ जण कोरोनाबाधित आढळल्याचे अहवालात नमूद केले आहे़ प्रत्यक्षात या दिवसापर्यंत जिल्ह्यात ३ हजार २२३ जण कोरोनाबाधित आढळले आहेत़ चाचण्यांमध्ये मराठवाड्यात जिल्हा सर्वात शेवटच्या स्थानावर आहे़ 

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८९ हजार ८२१ (२४ हजार ३२२ कोरोनाबाधित रुग्ण) तर जालना जिल्ह्यात ३६ हजार ५४ (५ हजार ८८ कोरोनाबाधित रुग्ण), हिंगोली २० हजार ६२६ (१ हजार ५४५), नांदेडमध्ये ४९ हजार ९३६ (७ हजार २०७), बीडमध्ये ६४ हजार ७९८ (४ हजार ८००), लातूरमध्ये ५५ हजार ८८८( ८ हजार ७०२) तर उस्मानाबादमध्ये ३९ हजार ४६० (६ हजार १०७ कोरोनाबाधित रुग्ण) संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत़ 

परभणी जिल्ह्याचा मृत्यूदर ४़४५ टक्केरूग्णांच्या मृत्यूदरामध्ये मात्र परभणी जिल्हा मराठवाड्यात टॉपवर आहे़ ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात १२३ जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्रशासनाने वरिष्ठांना सादर केला़ त्याचे प्रमाण ४़४५ टक्के आहे़ मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याचा रुग्ण मृत्यूचा दर २़९४ टक्के, नांदेड ३़४९ टक्के, लातूर ३़३१ टक्के, जालना २़९३ टक्के, बीड २़७१ टक्के, हिंगोली १़२९ टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २़७० टक्के मृत्यूदर आहे़ परभणीतील अधिकाऱ्यांसाठी ही चिंतनीय बाब आहे़ कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्यातही परभणी जिल्हा मागेच आहे़ जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ३९़२१ टक्के आहे़ मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे ८६़२८ टक्के रिकव्हरी रेट हिंगोली जिल्ह्याचा आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी