शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरतळा गावात तलाव फुटल्याने हाहाकार; अनेकांच्या घरात घुसले पाणी, शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 19:33 IST

rain in parabhani : प्रशासनाने तातडीने मदत केल्याने अनर्थ टळला

जिंतूर :- तालुक्यातील डोंगरतळा येथे गावालगत असणाऱ्या गाव तलावाची पाणी पातळी अचानक वाढल्याने तलावाची पाणी गावात घुसले. परिणामी गावातील 25 ते 30 घरातील जीवन उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणी इतरत्र वळवले आणि मोठा अनर्थ टळला

तालुक्यातील डोंगर तळा या गावालगत लघुसिंचन विभागाचा पन्नास वर्षे जुना असा गाव तलाव आहे या गाव तलावांमध्ये बारमाही पाणी साठा असतो यावर्षी झालेल्या अति पावसामुळे दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास तलावाची पाणी गावात घुसण्यास सुरुवात झाली पाहता पाहता पाण्याचा वेग वाढल्याने गावातील 25 ते 30 घराचे तलावाचे पाणी घुसले अचानक आलेल्या पाण्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले. या संदर्भातली माहिती तालुका प्रशासनाला कळाल्यानंतर तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार परेश चौधरी, तलाठी नितीन बुड्डे, ग्रामसेविका भाग्यश्री बेले यांच्यासह प्रशासनाने तातडीने गावाला भेट दिली.

तोपर्यंत गावातील 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरले होते. प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने पाणी इतरत्र काढून दिले. प्रशासनाने तातडीने दखल घेतल्यामुळे मोठा धोका टळला. दरम्यान, गावांमधील आणि घरात पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्य, धान्य, शेती उपयोगी अवजारे आदींचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

तातडीने पंचनाम्याची मागणीगावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासंदर्भात प्रशासनाने जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मागणी सरपंच कुंडलिक जवादे यांनी केली आहे

शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानगावात पाणी आलेच, यासोबत 100 एकरपेक्षा जास्त शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासंदर्भात महसूल प्रशासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे - गजानन पायगन, गावकरी डोंगरतळा

प्रशासनाची तत्परता, कायम स्वरूपी उपाय गरजेचायासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून डोंगरतळा गावात पाणी घुसले याचे प्रशासनाला माहिती मिळताच तहसीलदार सखाराम मांडवगडे व त्यांचे पथक यांनी तातडीने डोंगरकडा या गावाला भेट देऊन त्या ठिकाणी तळ्यातील गावात येणारे पाणी इतरत्र जेसीबीच्या साह्याने काढून काढून दिले दरम्यान ही तात्पुरती व्यवस्था प्रशासनाने केली असली तरी सध्याची परिस्थिती पाहता रात्री-बेरात्री पाण्याचा प्रवाह गावकऱ्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो यावर आता कायमस्वरूपी सिंचन विभागाने पर्याय काढणे गरजेचे आहे तसेच या तलावाची पाणी पातळी वाढविण्यासाठी गाळ काढणे ही अत्यंत महत्त्वाची आहे

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसagricultureशेती