शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

परभणीत तूर खरेदीचे अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:34 IST

जिल्ह्यातील सहा हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही १३ हजार ९०७ शेतकºयांच्या तुरीची खरेदी शिल्लक आहे. तूर खरेदीसाठी केवळ तीन दिवस प्रशासनाकडे शिल्लक असून, या काळात सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे. शासनाने तूर खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सहा हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही १३ हजार ९०७ शेतकºयांच्या तुरीची खरेदी शिल्लक आहे. तूर खरेदीसाठी केवळ तीन दिवस प्रशासनाकडे शिल्लक असून, या काळात सर्व शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी अधिकाºयांना कसरत करावी लागणार आहे. शासनाने तूर खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र सुरुवातीच्या काळात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत तूर विक्री करावी लागली. तुरीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकºयांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाभरातून ओरड वाढली. त्यानंतर परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा आणि बोरी येथे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, तूर खरेदीची गती अतिशय कमी होती. १८ एप्रिलपर्यंत हमीभावाने तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत ४९७३८.५० क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे १७ हजार १३९ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी केवळ ३ हजार २३२ शेतकºयांचीच तूर खरेदी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १९ टक्के शेतकºयांची तूर खरेदी करणे झाले असून, ८१ टक्के शेतकºयांची तूर येत्या तीन दिवसांत खरेदी करावी लागणार आहे.जिंतुरात सर्वाधिक खरेदीजिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रापैकी जिंतूर येथील हमीभाव खरेदी केंद्रावर सर्वाधिक १०८२१ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. सेलू येथील खरेदी केंद्रावर १०५७६ क्विंटल, गंगाखेड ८१२९.५० पूर्णा- ७७६९.५०, बोरी- ७२१६.५० आणि परभणी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत ५२२६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.मुदतीत खरेदीसाठी वाढविले काटेजिल्ह्यातील नोंदणी केलेल्या सर्व तूर उत्पादकांची तूर खरेदी करण्यासाठी मार्केटींग फेडरेशनने प्रत्येक खरेदी केंद्रावर २ काटे वाढविले आहेत. तर परभणी येथील खरेदी केंद्रावर आठ ते दहा काट्यांच्या साह्याने खरेदी सुरू करण्यात आली आहे. पूर्वी दिवसाकाठी १२०० ते १३०० क्विंटल तुरीची खरेदी होत होती. काटे वाढविल्यामुळे सुमारे अडीच हजार क्विंटल तुरीची खरेदी दररोज होत असल्याची माहिती मार्केटींग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली. असे असले तरी मुदतीत सर्व तूर खरेदी होणे अशक्य असल्याने खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.मुदत संपत आली तरी अर्ध्याहून अधिक शेतकºयांची तूर खरेदी बाकी असल्याने शेतकºयांतही चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाने सर्व शेतकºयांची तूर खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.तुरीसह जिल्ह्यात हरभºयाचीही खरेदी हमीभावाने केली जाणार आहे़ यासाठी राज्य शासनाने हमीभाव खरेदी करण्याचे आदेश दिले असले तरी अजूनही तीन केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही़ हरभरा विक्रीसाठी जिल्ह्यातील १ हजार ८८४ शेतकºयांनी प्रशासनाकडे नोंदणी केली आहे़ जिल्ह्यात ६ हमीभाव खरेदी केंद्र असून, त्यापैकी परभणी, गंगाखेड आणि बोरी हे तीन केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही. तर सेलू येथील खरेदी केंद्रावर २७७ क्विंटल, पूर्णा २०१़५० क्विंटल आणि जिंतूर येथील खरेदी केंद्रावर १३ क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आली आहे़ परभणी तालुक्यात ७८७, जिंतूर ८५, सेलू ५४५ आणि पूर्णा ४६७ शेतकºयांनी हरभºयाच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीGovernmentसरकार