शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रासरूट इनोव्हेटर : नाविन्यपूर्ण बॅगमुळे फुलांची तोडणी आणि साठवणीचा त्रास झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 12:10 IST

ग्रासरूट इनोव्हेटर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली फुलशेतीसाठी उपयुक्त बॅग

- प्रसाद आर्वीकर ( परभणी)

फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृह विज्ञान महाविद्यालयाच्या संशोधकांनी उपयुक्त अशी बॅग विकसित केली आहे़ 

राज्यामध्ये फुलशेतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दसरा, दिवाळी या सणोत्सवासाठी झेंडूची फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तर व्हॅलेंटाईन डेला सर्वाधिक गुलाब फुले विक्री होतात. यानुसारच अनेक शेतकरी आता फुलशेतीचे नियोजन करीत आहेत, तर असे काही शेतकरी आहेत ज्यांच्याकडे बारोमास फुलशेती केली जाते. परभणी जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची शेती  केली जाते.फुले तोडताना महिला शेतकऱ्यांना साठवणूक करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. कमी कालावधीत फुले तोडून ती बाजारात आणावी लागतात

हा त्रास कमी करण्यासाठी विद्यापीठाच्या गृहविज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी उपयुक्त अशी बॅग तयार केली असल्याची माहिती वरिष्ठ संशोधक डॉ़ जयश्री झेंड यांनी दिली़ ही बॅग कार्पोलियन कापडाचा वापर करून तयार करण्यात आली आहे़ बॅग अडकवून दोन्ही हाताने फुले तोडता येतात़ तसेच या बॅगला खालील बाजूने उघडण्याचीही सुविधा केल्याने जमा केलेली फुले एकाच वेळी पोत्यात साठवता येतात़ 

अशाच पद्धतीने गुलाबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही बॅग बनविण्यात आली आहे़ ही बॅग कॉटन ताडपत्रीपासून तयार केली असून, गुलाबाच्या काट्यांचा त्रास पाठीला होत नाही़ विशिष्ट पद्धतीने आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन या दोन्ही प्रकारच्या बॅग बनविल्याचे त्यांनी सांगितले़ अष्टूरची फुले तोडण्यासाठीही छोटी बॅग तयार केली आहे. या बॅग शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ