शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रासरूट इनोव्हेटर : शेतकरी स्त्रियांसाठी कोट, फिंगरगार्डची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:29 IST

ग्रासरूट इनोव्हेटर : या दोन्ही साधनांचा वापर करून वेचणी, निंदणी केल्यास श्रम आणि वेळेची बचत होणार आहे. 

- प्रसाद आर्वीकर  (परभणी)

शेतात काम करणाऱ्या महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयातील संशोधकांनी शेतकरी महिलांसाठी विशिष्ट असा कोट आणि फिंगरगार्डही बनविले आहे. या दोन्ही साधनांचा वापर करून वेचणी, निंदणी केल्यास श्रम आणि वेळेची बचत होणार आहे. 

शेती हंगामामध्ये कापूस वेचणीचे काम मुख्यत्वे महिलांनाच करावे लागते. यासाठी महिला सर्वसाधारणपणे एक झोळी हातात घेतात. तसेच तोंडाला कपडा बांधून तोडणी करतात, अशा पद्धतीने कापसाची वेचणी करताना महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. शिवाय कापसाच्या पराट्यांमुळे हातांना इजाही होते. ही बाब लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयातील वरिष्ठ संशोधक डॉ. जयश्री झेंड व त्यांच्या पथकाने शेतकरी महिलांसाठी विशिष्ट असा कोट तयार केला आहे.

संपूर्ण लांब बाह्यांचा हा कोट असून त्याला एक पिशवी जोडली आहे. या पिशवीला खालील बाजूने बंद बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पाच किलो कापूस या पिशवीत साठविता येतो आणि काम पूर्ण झाल्यानंतर पिशवीचे बंद सैल केल्यास कापूस खाली टाकला जातो. हा कोट महिला शेतकऱ्यांसाठी आरामदायक काम करण्यासाठी सोयीचा ठरत आहे. तसेच कापसाची वेचणी करीत असताना व भेंडी तोडताना उपयुक्त असे फिंगरगार्डही संशोधकांनी तयार केले आहेत. अ‍ॅल्युमिनियमपासून बनविलेले हे फिंगरगार्ड वापरून कापसाची वेचणी केल्यास हातांना इजा होत नाही. भेंडी तोडताना त्यातील चिकट द्राव हातांना लागत नाही. फिंगरगार्डमुळे आरामदायक कामे करता येतात, असे डॉ. जयश्री झेंड यांंनी सांगितले. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ