शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

साडेचार हजार शेतकऱ्यांना परत करावे लागणार अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:56 IST

दोन हजार प्रति महिन्याप्रमाणे चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यांत जिल्ह्यातील 290355 शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले.

ठळक मुद्देप्राप्तीकर भरल्यानंतर घेतला लाभ प्रशासनाने पाठविल्या नोटिसापीएम किसान योजना लाभार्थी तपासणीत बाब उघड 

परभणी : जिल्ह्यातील ४ हजार ६७७ शेतकरी प्राप्ती कर भरत असतानाही केंद्राच्या पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याची बाब उघड झाली असून, या धनिक शेतकऱ्यांना वितरित झालेले ४ कोटी २४ लाख १६ हजार रुपयांचे अनुदान शासनाला परत करावे लागणार आहे. 

गरीब व गरजू शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेत धनिकांचा समावेश झाल्याची बाब समोर आल्यानंतर शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून     कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने पीएम किसान योजनेतील ४ हजार ६७७ शेतकऱ्यांना नोटीस पाठवून अनुदान परत करण्याचे सूचित केले आहे. 

साडेचार हजार शेतकरी करदातेजिल्ह्यात ४ हजार ६७७ शेतकरी करदाते असून, त्यात जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ८२८, परभणी तालुक्यात ७००, सेलू ६५१, गंगाखेड ४५३, पाथरी ४४९, पूर्णा ३९२, मानवत ४०६, मानवत तालुक्यात ४३० करदाते शेतकरी आहेत. 

एकानेही परत केली नाही रक्कमकरदाते असताना लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत एकाही  शेतकऱ्याने उचलले अनुदान परत केले नाही. सध्या ही प्रक्रिया नोटीस स्तरापर्यंत आहे. 

आधार प्रमाणिकरणाचे अपात्रतेसाठी कारण पीएम किसान योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण न झाल्याने काही नावे वगळली आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी पती-पत्नी असे दोघांचेही नावे समाविष्ट केली. या शिवाय कर भरत असतानाही योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची नावे वगळली आहेत. 

इनकम टॅक्स भरत असतानाही अनुदानाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तहसीलस्तरावरून नोटीस दिल्या जात असून, या शेतकऱ्यांकडून वसुली केली जाणार आहे.  - महेश वडदकर, निवासी         उपजिल्हाधिकारी

तहसीलकडून वसुलीची प्रक्रिया सुरूकर भरत असतानाही अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना तहसील प्रशासनाने नोटीस पाठविल्या असून, प्रक्रिया सुरू आहे. 

 

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीfundsनिधी