शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील केवळ २४ लाभार्थ्यांनाच अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:41 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनेंतर्गत परभणी शहरातील केवळ २४ लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रती लाभार्थी ४० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे़ त्यामुळे घरकूल बांधकामांमध्ये अडथळे निर्माण होत असून, या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान वितरित करावे, अशी मागणी होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनेंतर्गत परभणी शहरातील केवळ २४ लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रती लाभार्थी ४० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे़ त्यामुळे घरकूल बांधकामांमध्ये अडथळे निर्माण होत असून, या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना अनुदान वितरित करावे, अशी मागणी होत आहे़सर्वांसाठी घरे ही संकल्पना राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी सुरू केली़ या योजनेंतर्गत शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी शासनाकडून निधी वितरित केला जातो़ परभणी महापालिकेच्या अंतर्गत ११ हजार २८६ लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत़ महानगरपालिकेने टप्प्या टप्प्याने या अर्जांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आतापर्यंत ५०० लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ या प्रस्तावांपैकी ८८ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष बांधकामाची परवानगी देण्यात आली असून, ४५ लाभार्थ्यांनी बांधकामही सुरू केले आहे़ या योजनेंतर्गत महापालिकेला २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ मंजूर आणि बांधकाम परवानगी दिलेल्या ८८ लाभार्थ्यांपैकी केवळ २४ लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रती लाभार्थी ४० हजार रुपये या प्रमाणे ९ लाख ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे़उर्वरित लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे अनुदान मिळाले नसल्याने बांधकाम करताना आर्थिक अडचण भेडसावत आहे़ काही दिवसांपूर्वी अनुदानाच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी आंदोलनही केले होते़ निधी उपलब्ध असतानाही अनुदानाची रक्कम वितरित करताना आखडता हात घेतला जात असल्याने योजनेच्या अंमलबजावणी विलंब लागत आहे़ ंजिल्ह्यात वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत आधीच बांधकामे करण्यासाठी उदासिनता असून, त्यात मनपाचे अनुदानही मिळत नसल्याने लाभार्थ्यांत उदासिनता आहे. महापालिका प्रशासनाने या योजनेला गती देण्यासाठी प्राप्त अर्जांना तातडीने मंजुरी द्यावी तसेच बांधकाम परवानगी दिलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करावी, अशी मागणी होत आहे़११ हजार नागरिकांनी केले अर्जप्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत लाभ मिळावा यासाठी महापालिकेकडे ११ हजार २८६ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत़ यापैकी जमिनीची साधन संपत्ती म्हणून वापर करून तेथेच पुनर्विकास करण्यासाठी ८ हजार ४७७ जणांनी अर्ज केले आहेत़ तसेच कर्ज सलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकासाठी परवडणाऱ्या घराची निर्मिती करण्यासाठी ४२८ जणांनी अर्ज केले आहेत़ शासकीय व खाजगी भागीदारीद्वारे आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी स्वस्त घरांची निर्मिती करण्यासाठी १ हजार ४२० अर्ज प्राप्त झाले आहेत़ तर आर्थिक दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांद्वारे व्यक्तीगत स्वरुपातील घरकूल बांधण्यासाठी ९६१ जणांनी अर्ज केले आहेत़योजनेला मिळेना गतीमहानगरपालिकेने ११ हजार अर्जांमधून ५०० अर्जांना घरकूल बांधकामासाठी प्रत्यक्षात मंजुरी दिली आहे़ परंतु, त्या पुढील प्रक्रिया संथगतीने सुरू आहे़ मंजूर केलेल्या अर्जांना तातडीने बांधकाम परवानगी आणि अनुदानाचा लाभ दिला तर या योजनेला गती मिळू शकते़ मंजूर अर्जांपैकी केवळ ८८ लाभार्थ्यांनाच बांधकाम परवानगी देण्यात आली असून, त्यातीलही ४५ जणांनी बांधकाम सुरू केले आहे़ ही आकडेवारी पाहता योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे़ या योजनेला गती देण्यासाठी मनपा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीHomeघर