शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

वारसदारांच्या खोट्या सह्याकरून नातवांनी राशन दुकान हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 19:32 IST

आजोबा मृत झाल्यानंतर आरोपींनी वारसदारांच्या नावे खोटी दस्तावेज तयार केली

गंगाखेड (परभणी ) : मृत राशन दुकानदाराच्या वारसदारांच्या खोट्या सह्या करून बनावट दस्ताऐवजा आधारे तालुक्यातील खादगाव येथील राशन दुकान हडपणाऱ्या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप बालासाहेब फड आणि श्रीनिवास बालासाहेब फड असे आरोपींची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील खादगाव येथील स्वस्त धान्य दुकान परवानाधारक सोपानराव मानाजी फड यांचे २१ डिसेंबर २०१८ रोजी निधन झाले.  मयत सोपानराव फड यांचे नातू दिलीप बालासाहेब फड (रा. यज्ञभुमी परिसर गंगाखेड) व श्रीनिवास बालासाहेब फड ( रा. खादगाव ता. गंगाखेड ) यांनी संगनमत करून सोपानराव यांच्या पश्चात असलेल्या वारसांच्या खोट्या सह्या करून खोटी दस्तावेज तयार केली. तसेच तहसील कार्यालयामार्फत जिल्हा पुरवठा यांच्याकडे प्रस्ताव दाखल  केला. यानंतर एका आठवड्याच्या आत सर्व कार्यालयीन कार्यवाही पूर्ण करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळवला. यातून मृताच्या वारसदरांचे पुष्पादेवी राम मुंडे रा. अरबुजवाडी ता. गंगाखेड, अशोक सोपानराव फड रा. खादगाव ता. गंगाखेड यांची व शासनाची फसवणूक केली. 

ही बाब उघडकीस आल्यानंतर दिलीप फड यांनी स्वस्त धान्य दुकानाचे प्रकरण दाबून टाकण्याच्या उद्देशाने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पुष्पादेवी राम मुंडे व अशोक सोपानराव फड यांनी प्रथम पोलीस ठाण्यात व त्यानंतर न्यायालयात दाखल केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून ८ मार्च  शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दिलीप फड व श्रीनिवास फड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश राठोड हे करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसparabhaniपरभणी