शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलकांना नोटीसा पाठविण्याच्या भानगडीत सरकारने पडू नये, मनोज जरांगे यांचा इशारा

By ज्ञानेश्वर भाले | Updated: December 22, 2023 15:24 IST

नोटीसा देत आंदोलनाची धार कमी करण्याचा सरकारकडून निष्फळ प्रयत्न: मनोज जरांगे

सेलू (जि.परभणी ) : गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलकांना सरकार, प्रशासनाकडून नोटीसा देण्यात येत आहे. आंदोलनाची धार कमी करण्याचा हा प्रयत्न असला तरीही यांचा मराठा समाज बांधवांवर काहीच परिणाम होणार नाही. उलट दुप्पट लोक आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या भानगडीत सरकारने पडू नये, असा विनंती वजा इशारा  मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सेलूत पत्रपरिषद दिला. नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरील जाहीर सभेपुर्वी ते मुक्कामी असलेल्या एका मंगल कार्यालयात सकाळी  पञकारांशी बोलत होते.

राज्यातील विविध भागात मराठयांच्या ५४ लाख कुणबी नोंदी आढळून आल्याची वस्तुस्थिती असून ती मराठयांना मागास ठरविण्यासाठी पुरेशी आहे. मराठयांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास कोणीही आडवू शकत नाही. त्या कागदावरील चारही मुद्यावर आम्ही ठाम आहोत. सगे सोयरे हा शब्द तज्ज्ञ समितीने टाकला आहे. दोन महिन्यांपूवी उपोषण सोडण्यासाठी सरकारी प्रतिनिधी, तज्ज्ञ समितीने लिहून दिलेले ते चारही शब्दांची सरकारने दोन दिवसात पूर्तता करावी. यावेळी पञकारांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे देताना आरक्षणाच्या मुद्दय़ावर ठाम असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारने मराठा तरुणांना नोटीसा देण्यावर भर दिला आहे. एक प्रयोग केला दुसरा करु नये. नोटीस बजावून नुसती छाती बडवून तुम्हाला काय हुशारी दाखवाची?  गैरसमजातून सरकारने बाहेर यावे. असे  जरांगे पाटील यांनी सरकारला आवाहन केले. 

'त्या' कागदावरील चारही मूद्द्यावर ठामदोन महिन्यापूर्वी  उपोषण सोडविण्यासाठी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधीसह तज्ज्ञ शिष्टमंडळाने लिहून दिलेले चारही शब्द आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामूळे त्यांनी लिहून दिलेल्या शब्दाची पूर्तता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आंदोलन सूरूच राहणार असून दोन महिन्यापूर्वी सरकारने दिलेल्या लेखी उत्तरामध्ये चार शब्द लिहिलेले आहेत. यातील एक शब्द मी २४ डिसेंबरल पुढील दिशा ठरवतांना जाहिर करणार आहे. १९६७ च्या नोंदीनूसार त्यांचा संपूर्ण परिवार त्यांचे सर्व नातेवाईक, त्यांचे सर्व रक्ताचे सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील असे सरकार कडूनच मला लेखी देण्यात आले आहे. मात्र,२१ डिसेंबरला सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेले मंत्री गिरिष महाजन, उदय सावंत, संदिपान भूमरे यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र, यातील जास्तीत जास्त वेळ सगेसोयरे या एका शब्दावर चर्चा होवून देखील शासनाचे प्रतिनिधी यांच्याकडून माझे समाधान झाले नाही. त्यामूळे शासनाने मला जे लिहून दिले तेच मी मागत आहे. त्या भूमिकेवर मी  ठाम राहणार असल्याची ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांना बोलतांना दिली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणparabhaniपरभणी