पुणे येथे डॉक्टरांनी डॉक्टरांसाठी नुकतीच मेडिक्वीन मेडिको पेजंटतर्फे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत विवाहित महिला डॉक्टरांसाठी ‘बेस्ट रॅम्प वॉक विनर’ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत गंगाखेड येथील माजी शिक्षणाधिकारी शंकरराव वाघमारे व जिल्हा परिषद सदस्या प्रभावती वाघमारे यांची कन्या डॉ. उषा किशन काळे या विजेत्या ठरल्या आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. उषा काळे यांना मानाचा मुकुट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. काळे या मुंबई येथील विरार भागात राहतात. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिनेते समीर धर्माधिकारी, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. कांचन मदार, डॉ. मीनाक्षी देसाई, पूजा वाघ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर, समन्वयक डॉ. प्राजक्ता शहा, दिग्दर्शक व मार्गदर्शक डॉ. योगेश पवार आदींची उपस्थिती होती. राज्यातून ३०० महिला डॉक्टरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ४० महिला डॉक्टर होत्या. प्रत्येकाचे समाजकार्य, व्यक्तिमत्त्व व वक्तृत्व याशिवाय बरेच निकष यासाठी लावण्यात आले होते.
गंगाखेडच्या उषा काळे ‘मिसेस महाराष्ट्र- मेडिक्वीन बेस्ट रॅम्प वॉक विनर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST