शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड नगरपालिकेचे ३६ लाख रु. परत; पाच वर्षात खर्च करण्यात ठरले असमर्थ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 15:36 IST

विकासकामे करण्यासाठी दिलेला निधी खर्च न झाल्याने गंगाखेड पालिकेला ३६ लाख ८३ हजार रुपये शासनाला परत करावे लागले आहेत.

ठळक मुद्देपरभणी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांकडील अखर्चित निधीचा आढावा घेतला केवळ गंगाखेड पालिकेकडे ३६ लाख ८३ हजार ३०६ रुपये २०१३-१४ पूर्वी उपलब्ध झाले असूनही, हे पैसे अद्याप खर्च झाले नसल्याची माहिती समोर आली.

परभणी : विकासकामे करण्यासाठी दिलेला निधी खर्च न झाल्याने गंगाखेड पालिकेला ३६ लाख ८३ हजार रुपये शासनाला परत करावे लागले आहेत. मार्च महिन्यात राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात केवळ गंगाखेड पालिकेतूनच अखर्चित निधी परत करावा लागला.

शहरात विकासकामे करण्यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देते. त्यामुळे त्या त्या वर्षात उपलब्ध झालेल्या निधीतून शहर विकास साधला जातो. मात्र अनेक वेळा मिळालेला निधी खर्चच केला जात नाही. कधी मान्यते अभावी तर कधी तांत्रिक अडचणींमुळे हा निधी वर्षानुवर्षे पडून राहतो.  शक्यतो दिलेला निधी खर्च करण्यासाठी ठराविक मुदतही घालून दिली जाते. त्याच मुदतीत निधी खर्च केल्यास शहरात विकासकामेही मार्र्गी लागतात. मात्र काही वर्षापूर्वी दिलेला निधी अद्यापही खर्च झाला नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे नगरविकास विभागाने १२ मार्च रोजी एक आदेश काढून स्थानिक स्वराज्य संस्थांना मंजूर केलेला निधी विहित कालावधीत खर्च न झाल्यास २०१३-१४ व त्यापूर्वीचा निधी तत्काळ शासन जमा करण्याचे आदेश दिले होते.

परभणी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांकडील अखर्चित निधीचा आढावा घेतला असता केवळ गंगाखेड पालिकेकडे ३६ लाख ८३ हजार ३०६ रुपये २०१३-१४ पूर्वी उपलब्ध झाले असूनही, हे पैसे अद्याप खर्च झाले नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे गंगाखेडच्या मुख्याधिकाऱ्यांनी थेट नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार करीत शिल्लक राहिलेला ३६ लाख ८३ हजार ३०६ रुपययांचा निधी शासनाकडे जमा केले आहेत.

घनकचरा व्यवस्थापनाची सर्वाधिक रक्कम२०१३-१४ व त्यापूर्वी गंगाखेड पालिकेकडचे सुमारे ३६ लाख रुपये खर्च होणे शिल्लक आहे. विशेष म्हणजे त्यातील ३५ लाख ५ हजार ५२ रुपये एवढी रक्कम १२ व्या वित्त आयोगाच्या घनकचरा व्यवस्थापन अनुदानापोटी नगरपालिकेला मिळाली होती. राज्यभर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गाजत असताना पाच वर्षांपासून यासाठी निधी मिळूनही गंगाखेड नगरपालिका कामे करु शकली नाही, हेच शिल्लक निधीतून दिसून येत आहे.त्याचप्रमाणे अकराव्या वित्त आयोगातील ९० हजार ७७०, बाराव्या वित्त आयोगातील १७ हजार ३४१ आणि मराठवाडा विकास एकात्मिक कार्यक्रमातील १३ हजार ३९, नेहरु रोजगार योजनेतील २ हजार ३३५ आणि ड्राय लट्रिन कन्वरजन अनुदानाचे ३ हजार ५०७ असे ३८ लाख ८३ हजार गंगाखेड पालिकेकडे शिल्लक असून, ही रक्कम शासन जमा करण्याची प्रक्रिया पालिकेने केली आहे.

मुख्याधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी केली निश्चितशासनाने योजनांसाठी दिलेला निधी वेळेत खर्च करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी तसेच महापालिकेच्या आयुक्तांची आहे. त्यामुळे मुख्याधिकारी, आयुक्तांनी या निधीचा आढावा घेतला पाहिजे. तसेच कालमर्यादेत विकास कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पंधरा दिवसांतून एक वेळा आढावा घ्यावा, असे नगरविकास विभागाने काढलेल्या शासन आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षMONEYपैसाMuncipal Corporationनगर पालिकाparabhaniपरभणी