शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

लाठीकाठीचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 09:17 IST

सहा आरोपींविरुद्ध गुन्हा, एक आरोपी अल्पवयीन, एक फरार

लोकमत न्यूज नेटवर्क, जिंतूर (जि. परभणी) : प्रेमीयुगल आपसात गप्पा मारत बसलेले असताना युवकांच्या सहाजणांच्या टोळक्याने संबंधिताला लाठीकाठीचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच हजार रुपये घेत तिघांनी युवतीवर सामूहिक अत्याचार केला. शिवाय संबंधित  घटनेचे चित्रणही केले. याप्रकरणी जिंतूर पोलिसात संबंधित सहाही आरोपींविरुद्ध  रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यात चारजणांना अटक केली असून एक जण फरार आहे व एक अल्पवयीन आहे. ही घटना दि. १४ ऑक्टोबरला दुपारी अकराच्या सुमारास घडली  होती.

पीडित मुलीने १९ ऑक्टोबरला पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत पीडित मुलीने सांगितले की, मी आणि माझा मित्र मारुती खरात मंगळवारी दुपारी  देवी संस्थान मंदिराच्या इटोली शिवारात झाडाखाली गप्पा मारत बसलो असताना तेथे दुचाकीवरून अनोळखी सहा इसमांनी लाठीकाठीचा धाक दाखवून तुमच्याकडे किती पैसे आहेत ते द्या  असे म्हंटले, त्यापैकी एकाने बॅग हिसकावली तर दुसऱ्याने बॅग मधील पाच हजार रुपये काढून घेतले. शेषराव, करण व साबीर नावाच्या तीन मुलांनी माझ्यावर आळीपाळीने अत्याचार केला तर, मुन्ना नावाच्या मुलाने व्हिडीओ शूटिंग केली.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी करण दतराव बुरकुले, शेषराव दतराव शेवाळे, शेख साबीर शेख सत्तार, करण मोहिते व इतर दोन अल्पवयीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी करण बुरकुले, शेषराव शेवाळे, शेख साबिर, मुन्ना टोपे यास पोलिसांनी अटक केली असून, करण मोहिते हा फरार आहे. एक आरोपी अल्पवयीन आहे का याची पडताळणी पोलिस यंत्रणा करीत आहे. 

पोलिसांची सतर्कता

कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना पोलिसांनी स्वतःहून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती आधारे घटनेची पडताळणी करून आरोपीस ताब्यात घेऊन कार्यवाही केली, तर पीडितेचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

यात पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहायक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल यांनी कार्यवाहीनंतर जिंतूर येथे भेट देऊन कार्यवाहीवर नियंत्रण ठेवत मार्गदर्शन केले. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gang rape with threats of sticks; four arrested.

Web Summary : A young woman was gang-raped in Jintur after being threatened with sticks. The perpetrators also filmed the crime. Police arrested four accused; one is absconding, and one is a minor. The incident occurred on October 14th.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी