शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा नियोजन समितीचा निधी: आरोग्य केंद्र बांधकामासाठी ७ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:32 IST

जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन धर्मशाळा बांधकाम व ३ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी एकूण ६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला असून सदरील निधीची रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन धर्मशाळा बांधकाम व ३ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी एकूण ६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला असून सदरील निधीची रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे.जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम व विस्तारीकरण या योजनेअंतर्गत येलदरी, पाथरगव्हाण, आसेगाव, कोद्री, कावलगाव, पेडगाव, वाघाळा, वालूर, आडगाव, देऊळगाव गात, पिंपळदरी, सोनपेठ या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नवीन धर्मशाळा बांधण्यासाठी प्रत्येकी ८ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच येलदरी, हादगाव, आसेगाव, देऊळगाव गात येथे नवीन औषधी भांडार केंद्र उभारण्यासाठी प्रत्येकी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.धानोरा काळे येथील औषधी भांडारासाठी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच कौसडी आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारत बांधकामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हादगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत विस्तारीकरणासाठी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.तीन उपकेंद्रांसाठी२ कोटी ४० लाख४पाथरी तालुक्यातील देवनांद्रा, कोथाळा व रामपुरी खु. या तीन प्राथमिक उपकेंद्रांच्या नवीन इमारती बांधण्यासाठी प्रत्येकी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोथाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करुन त्याला निधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जि.प.सदस्य विष्णू मांडे यांनी पाठपुरावा केला. याबाबत त्यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेतही विषय उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांच्या मागणीची दखल घेत, यासाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.१९ आरोग्य केंद्रांची होणार दुरुस्ती४जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी ५२ लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये हादगाव, मरडसगाव, कसर, हरंगुळ, चुडावा, पेडगाव, लिंबा, लिमला, पिंपळदरी, खडका, फुलकळस, केकरजवळा या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर भोसी आरोग्य उपकेंद्रासाठी ४ लाख रुपये आणि झरी, सावंगी, कोक, वझर बु. येथील आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी २ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पिंपळगाव गायके येथील आरोग्य उपकेंद्रासाठी अडीच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.