शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : साई जन्मभूमीच्या आराखड्यासंदर्भात राजभवनात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:03 IST

येथील साई जन्मभूमीच्या विकासासंदर्भात तयार केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत १३ जानेवारी रोजी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़ राष्ट्रपतींनी आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिला असून, साई जन्मभूमीच्या विकासाला यामुळे चालना मिळणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : येथील साई जन्मभूमीच्या विकासासंदर्भात तयार केलेल्या १०० कोटी रुपयांच्या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत १३ जानेवारी रोजी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़ राष्ट्रपतींनी आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिला असून, साई जन्मभूमीच्या विकासाला यामुळे चालना मिळणार आहे़बिहारचे राज्यपाल असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाथरी येथील साई मंदिराला भेट दिली होती़ त्यावेळी पाथरी नगरपालिका प्रशासनाला त्यांनी विकासाचा आराखडा तयार करण्याचे सुचविले होते़ त्यानंतर पाथरी पालिकेने १०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला़ त्याचप्रमाणे मानवत रोड ते पाथरी हा रेल्वेमार्गही प्रस्तावित झाला आहे़ या पार्श्वभूमीवर पाथरी नगरपालिकेने जन्मभूमीच्या विकासासाठी तयार केलेला १०० कोटींचा आराखडा राज्य शासनाला सादर केला होता़ यासंदर्भाने आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे चर्चेसाठी वेळ मागितला होता़ त्यावर राष्ट्रपतींनी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील राजभवनात चर्चेसाठी बोलावले असून, यावेळी विकास आराखडा आणि रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे़, अशी माहिती आ़ दुर्राणी यांनी पाथरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली़ या शिष्टमंडळात साई संस्थानचे संजय भुसारी, प्रकाश सामंत, बालाप्रसाद मुंदडा, अ‍ॅड़ अतुल चौधरी यांनाही आमंत्रित केले आहे़ पाथरी हे साईबाबांची जन्मभूमी असून, १७ वर्षांपूर्वी या ठिकाणी प्रती शिर्डी साई मंदिराची स्थापना करण्यात आली आहे़ मात्र या जन्मभूमीचा विकास झाला नाही़ शासनाने तीर्थक्षेत्र विकासासाठी या मंदिराची निवड केली असली तरी मोठा निधी प्राप्त झालेला नाही़ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या विकासासंदर्भात चर्चेसाठी वेळ दिल्याने येथील विकास कामांना चालना मिळेल, अशी आशा आहे़