शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:40 IST

शहरातील धाररोडवरील शासकीय वसतिगृहातील मुलींनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी वसतिगृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील धाररोडवरील शासकीय वसतिगृहातील मुलींनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी वसतिगृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.शहरातील धाररोडवर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहामध्ये ६५ मुली निवास करतात. या मुलींना शासनाच्या वतीने सुविधा देण्यात येतात. परंतु, वसतिगृह प्रशासनाच्या वतीने मुलींना स्टेशनरी व भत्ता देण्यात येत नसल्याने आणि फळे दिली जात नसल्यावरुन मुलींनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता वसतिगृहातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन वसतिगृहात येणाºया अडचणी सांगितल्या. तसेच शासनाच्या वतीने देण्यात येणारा भत्ता तात्काळ देण्यात यावा, मेसमधील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाधिकाºयांनी वसतिगृहास भेट देण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आंदोलनात मुक्ता तिडके, रुपाली खिल्लारे, स्वाती देवकर, अफसाना शेख अयुब, वर्षा वाव्हळे, उमा पुंडगे, मीरा आसोरे, पूजा साळवे, वर्षा साबळे, उषा हारकळ, राजश्री टोंपे, साधना वायवळ, नेहा लोणकर, मुक्ता बुधवंत, प्रज्ञा बनसोडे, विद्या जाधव आदींसह ४३ विद्यार्थिनींचा यामध्ये सहभाग होता.महागाई निर्देशांप्रमाणे दरवाढ नाहीया वसतिगृहाला भोजनाचा पुरवठा करणाºया बहुजन हिताय भोजन उत्पादक व पुरवठा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेने जिल्हाधिकाºयांकडे खुलासा दिला आहे. त्यात म्हटले आहे की, समाजकल्याण विभागाकडून पाच वर्षापूर्वीचे दर मंजूर आहेत. पाच वर्षात भोजनाच्या साहित्याचे दर दुप्पट- तिप्पट वाढले असतानाही जुन्या दराने संस्था पुरवठा करीत आहे. नवीन दरवाढीसाठी संस्थेने दोन वर्षापासून १० वेळा महागाई निर्देशांकाप्रमाणे दरवाढ देण्याची मागणी केली. अथवा भोजन पुरवठा बंद करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. परंतु, या विभागाच्या अधिकाºयांनी नवीन निविदा नसल्यामुळे विद्यार्थी हितासाठी भोजन पुरवठा सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नुकसान सहन करीत संस्था चांगला भोजन पुरवठा करीत आहे. तरीही तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे एकतर नवीन दरवाढ द्यावी, अन्यथा भोजन ठेका बंद करण्याची परवानगी द्यावी.