शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी, पालम, गंगाखेड, पूर्णा येथे मोर्चा : ‘राष्ट्रवादी’चा सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:02 IST

केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम या ठिकाणी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम या ठिकाणी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देऊन जिल्ह्यात बोंडअळीचे सर्वेक्षण करावे, शेतकºयांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी हे मोर्चे काढण्यात आले़ गंगाखेड येथील मोर्चेकºयांनी तहसीलदारांना बोंडअळीग्रस्त कापसाची झाडे भेट दिली़ पूर्णा येथील मोर्चकºयांनी राज्य शासन व केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला़ पालम येथे काढण्यात आलेल्या मोर्चात पदाधिकाºयांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर जोरदार टीका केली़ परभणी येथील मोर्चामध्ये सहभागी झालेल्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत शासनाचे लक्ष वेधले़ जिल्ह्यात निघालेल्या या मोर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़परभणी येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला़जिंतूर रोडवरील जामकर महाविद्यालयाच्या प्रांगणातून दुपारी १२ वाजता या हल्लाबोल मोर्चास प्रारंभ झाला़ या मोर्चात माजीमंत्री फौजिया खान, अ‍ॅड़बाळासाहेब जामकर, माजी महापौर प्रताप देशमुख, विजय जामकर, किरण सोनटक्के, माजी खाग़णेशराव दुधगावकर, अ‍ॅड़विष्णू नवले, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, संतोष बोबडे, जलालोद्दीन काजी, महेबुब अली पाशा, संजय कदम, माणिक जेवणार, अशिष हरकळ, मोहम्मद गौस, संग्राम जामकर, गंगाधर जवंजाळ, इम्रान लाला, सुमंत वाघ, रेखा आवटे, किरण तळेकर, सिद्धार्थ भराडे, रमाकांत कुलकर्णी, राजेंद्र वडकर, सुरेंद्र रोडगे, नंदाताई राठोड, नंदकिशोर शिंदे, शंकर भागवत, रामेश्वर आवरगंड, संगीता पवार, गंगासागर वाळवंटे, दिनेश परसावत, मनोज राऊत, जलील पटेल, अ‍ॅड़अमोल पाथरीकर, अ‍ॅड़रमेश रासवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़पालम- तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी राकाँच्या वतीने २९ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला़ मोर्चेकºयांनी सरकारविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता़ शहरातील नवा मोंढा भागातील तालुका संपर्क कार्यालयापासून हलगी वाजवित मोर्चाला सुरुवात झाली़ कापसाचे बोंडअळीग्रस्त झाडे हातात घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.गंगाखेड येथे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला़ तहसीलदार आसाराम छडीदार यांना शेतकºयांनी सोबत आणलेली कापसाची झाडे भेट देवून निवेदन सादर केले़