जिल्ह्यात कोरोनाचे संकट निर्माण झाले असून या काळात रुग्णांची वाहतूक करताना रुग्णवाहिकांना मोठ्या प्रमाणात इंधनाची आवश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन रिलायन्स पेट्रोलियमने शासकीय रुग्णालयांतील रुग्णवाहिकांना मोफत इंधन देण्याचा निर्णय घेतला आहे. आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, रिलायन्स पेट्रोलियमचे संचालक भागवत कदम, अनिल डहाळे, सुशील कांबळे, मारुती तिथे आदींची उपस्थिती होती. आ. डॉ. राहुल पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात प्रत्येकजण मदतीसाठी पुढे येत आहे. या काळात एकमेकांना साहाय्य करणे गरजेचे असून रिलायन्स कंपनीने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहे, असे सांगून निर्णयाचे त्यांनी कौतुक केले.
शासकीय रुग्णवाहिकांना रिलायन्सतर्फे मोफत इंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST