शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

परभणीत उपजिल्हाधिकाऱ्यांची चार पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकाºयांची चार पदे रिक्त असल्याने त्याचा नियमित कामकाजावर परिणाम होत आहे.परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन, पुनर्वसन, सामान्य प्रशासन, रोजगार हमी योजना, पुरवठा, निवडणूक व निवासी उपजिल्हाधिकारी अशी एकूण ७ उपजिल्हाधिकाºयांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी व निवडणूक उपजिल्हाधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकाºयांची चार पदे रिक्त असल्याने त्याचा नियमित कामकाजावर परिणाम होत आहे.परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन, पुनर्वसन, सामान्य प्रशासन, रोजगार हमी योजना, पुरवठा, निवडणूक व निवासी उपजिल्हाधिकारी अशी एकूण ७ उपजिल्हाधिकाºयांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी व निवडणूक उपजिल्हाधिकारी या तीन पदांवरच अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित भूसंपादन व पुनर्वसन विभागाचा पदभार उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तर रोहयो विभागाचा पदभार सेलू येथील सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आला आहे. निवडणूक विभागाला बिबे हे उपजिल्हाधिकारी कायमस्वरुपी मिळाले आहेत. तर जिल्हा पुरवठा अधिकाºयांचा पदभार निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याशिवाय गंगाखेड येथील उपविभागीय अधिकाºयांचे पद ही रिक्त आहे. विशेष म्हणजे येथील तहसीलदार छडीदार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा पदभार सोनपेठचे तहसीलदार जीवराज डापकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदारांचे पदही रिक्तच आहेत. या रिक्त पदांचा नियमित कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन ही पदे भरण्याची गरज आहे.१५ अधिकाºयांच्या बदल्या, तरीही...राज्य शासनाने ३ एप्रिल रोजी राज्यातील १५ उपजिल्हाधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद येथील अधिकाºयांचा समावेश आहे. परंतु, या यादीत परभणीतील अधिकाºयांचा समावेश नाही. त्यामुळे राज्य शासनाचे परभणीकडे दुर्लक्ष झाले आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTransferबदलीcollectorतहसीलदारParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी