शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमध्ये कामाची सक्ती आता भत्ता देण्यासाठी मात्र हात आखडता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:43 IST

कर्मचाऱ्यांचे निवडणुकीतील मानधन आणि भत्ता निवडणूक आयोगाकडून अद्याप देण्यात आला नाही.

- विठ्ठल भिसे पाथरी : विधानसभा निवडणुकीचे सोपस्कार पूर्ण झाले. सरकार सत्तेत आले. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये क्षेत्रिय अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या कर्मचाऱ्यांचे निवडणुकीतील मानधन आणि भत्ता निवडणूक आयोगाकडून अद्याप देण्यात आला नाही. याबाबतची ओरड आता या कर्मचाऱ्याकडून होत असून हा भत्ता केव्हा मिळणार, अशी विचारणा केली जाऊ लागली आहे. निवडणूक काळात अधिकाऱ्यांवर सक्ती होती. मात्र, आता मानधन देण्यास हात का आखडता घेतला जात आहे, याचे कोडे या अधिकाऱ्यांना पडले आहे.

पाथरी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडली. विधानसभा मतदारसंघात पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी तालुक्यातील काही गावे असा भाग येतो. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक बुथवर विविध कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त केले होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी या मतदारसंघांमध्ये तब्बल ५३ क्षेत्रिय अधिकारी नेमले होते. निवडणूक काळामध्ये या अधिकाऱ्यांकडे पाच ते सहा बूथ निगराणीसाठी देण्यात आले होते. एका क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे सहा ते सात मतदान केंद्रांचे नियोजन होते. मतपेट्या घेतल्या का ? त्या सुरक्षित पोहोचल्या का? मतदान केंद्राध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था व्यवस्थित आहे का ? मतदान सुरळीत आहे का ? प्रत्येक दोन घंट्यानंतर मतदानाची टक्केवारी घेणे आणि वरिष्ठांना पाठवणे. मतदान पेट्या व्यवस्थित पोहोचवणे ही कामे प्रामुख्याने क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे होती. त्याचबरोबर मतदान मोजणीसाठी प्रक्रियेच्या ठिकाणी थांबणे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी या क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी चोख पार ही पाडली. मात्र, निवडणूक होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी हे अधिकारी मानधनापासून क्षेत्रीय वंचित अद्याप वंचित आहेत.

७ हजार ५०० रुपये भत्ताविधानसभा निवडणुकीमध्ये क्षेत्रिय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांना सात हजार ५०० रुपये भत्ता देणे अपेक्षित होते. निवडणुकीदरम्यान या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना एक हजार पाचशे रुपये कॅश स्वरूपात भत्ता वाटप करण्यात आला. मात्र, भत्त्याची उर्वरित रक्कम या अधिकाऱ्यांना अद्यापपावेतो मिळाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार इतर मतदारसंघांमध्ये क्षेत्रिय अधिकारी यांना सात हजार पाचशे रुपये भत्ता निवडणूक दरम्यान वाटप करण्यात आल्याने पाथरी मतदारसंघातील क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आपल्यावर अन्याय झाल्याची भावना झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केलानिवडणूक काळामध्ये काम करणाऱ्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांना पंधराशे रुपये भत्ता वाटप केला. आणखीन त्यांना उर्वरित सात हजार पाचशे रुपये भत्ता दिला जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला. शासनाकडूनच रक्कम उपलब्ध झाली नसल्याने ती उपलब्ध होताच अधिकाऱ्यांना भत्ता वाटप केला जाणार आहे.- शैलेश लाहोटी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग