शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

लेंडी, गळाटी नद्यांना पूर; पालम तालुक्यातील १४ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 13:51 IST

Rain in Parabhani : पालम शहरालगतच्या पुलावरूनही पाणी वाहत असल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड गावचा संपर्क देखील तुटलेला आहे.

पालम ( परभणी ) :  तालुक्यातील गळाटी व लेंडी नदीच्या पुरामुळे २३ सप्टेंबर रोजी तब्बल १४ गावांचा संपर्क पालमशी तुटला आहे. तर पावसामुळे गुळखंड येथील कोरोना लसीकरण रद्द करण्यात आले आहे. ( flooding to Lendi and Galati rivers;14 villages in Palam taluka lost contact) 

मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने पालम तालुक्यातील बहुतांश नद्यांना पूर आलेला आहे. लेंडी नदीच्या पुरामुळे 22 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नऊ गावांचा संपर्क तुटला होता. तो 24 सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा एकदा नदीला पूर आल्याने ही गावे संपर्क बाहेर आहेत. प्रामुख्याने पुयनी येथील पुलावरून लेंडी नदीचे पाणी वाहू लागल्याने सकाळी १० वाजल्यापासून पुयनी, आडगाव, खडी, वनभुजवाडी, तेलजापुर आणि गणेशवाडीचा संपर्क पालम शहराशी तुटला आहे. दूसरीकडे याच नदीवरील पालम शहरालगतच्या पुलावरूनही पाणी वाहत असल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड गावचा संपर्क देखील तुटलेला आहे. तर गळाटी नदीवरील सायळा ते सिरपूर दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामूळे ११.४५ वाजल्यापासून सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडीचा संपर्क पालमशी होऊ शकत नाही. 

दूध घेऊन येणारा ऑटोरिक्षा फसलापालम तालुक्यातील खुर्लेवाडी येथून दूध घेऊन केरवडीला येणारा ऑटोरिक्षा सिरपूर ते सायाळा दरम्यानच्या रोडवर सकाळी ७ वाजता फासला होता. अखेर वाहनातील दुधाच्या कॅन बाहेर काढून चौघांना ऑटोरिक्षा ढकलून चिखलाबाहेर काढावा लागला. पाऊस आल्यानंतर हा प्रश्न हमखास उद्भवतो, अशी माहिती ऑटोचालक भगवान गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह 

हेही वाचा - शिवणगावजवळ मालगाडीचे डबे रुळावरून उतरले; प्रवासी रेल्वे वाहतूक खोळंबली

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी