शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

पाथरी तालुक्यातील पाच हजार शिधापत्रिका आधारविना; पुरवठा विभागाच्या वतीने शोध मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 15:14 IST

२६ हजार ३६७ शिधापत्रिकांपैकी ५ हजार ४६२ शिधापत्रिका आधारकार्डाविना आहेत़ पुरवठा विभागाने आधारविना असलेल्या शिधापत्रिकांची सर्वेक्षण मोहीम तलाठ्यामार्फत हाती घेतली असून, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे़ 

- विठ्ठल भिसे  पाथरी (परभणी ) : तालुक्यातील २६ हजार ३६७ शिधापत्रिकांपैकी ५ हजार ४६२ शिधापत्रिका आधारकार्डाविना आहेत़ पुरवठा विभागाने आधारविना असलेल्या शिधापत्रिकांची सर्वेक्षण मोहीम तलाठ्यामार्फत हाती घेतली असून, घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे़ 

केंद्र व राज्य शासनाच्या अन्नधान्याच्या विविध योजनांमार्फत लाभार्थ्यांना स्वस्तधान्य दुकानदारामार्फंत अन्नधान्याचे वितरण करण्यात येते़ सार्वजनिक वितरण प्रणालीतील त्रुटी व दोषामुळे अन्नधान्य वाटपाचा बराच सावळा गोंधळ पहावयास मिळत आहे़ बोगस लाभार्थ्यांच्या नावे धान्य उचलून काळाबाजारातही जात आहे़ हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे़ राज्य शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी सर्वच योजनांमधील शिधापत्रिका लाभार्थ्याच्या आधारकार्डला जोडण्याचा निर्णय घेतला़ मात्र दोन वर्षांपासून आधार जोडणीचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही़ २६ हजार ३६७ शिधापत्रिकांपैकी २० हजार ९०५ शिधापत्रिकाधारकांनी आधारची जोडणी केली आहे़ तर अजूनही ५ हजार ४६२ शिधापत्रिका आधारला जोडणे बाकी आहे.

आता शिधापत्रिका आधार जोडणी मोहीम हाती घेतली आहे़ १२ ते १५ जानेवारी २०१८ या कालावधीत ग्रामीण भागातील शिधापत्रिका आधार जोडणी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली़ यावेळी शिधापत्रिका धारकांचे नाव, गाव, स्थलांतरित, मयत, लग्न झालेल्या महिलांची नोंद घेण्यात आली आहे़ यासोबतच लाभार्थ्यांकडे गॅस सिलिंडर आहे की नाही याचीही माहिती घेतली जात आहे़ 

१२ हजार ९०८ कार्डांचीच ई-पॉस मशीनला जोडणी

ई-पॉस मशीनच्या साह्याने  धान्य वितरण करण्याची सक्ती दुकानदारांना करण्यात आली़ पाथरी तालुक्यात ७८ स्वस्तधान्य दुकानदारांना ई-पॉस मशीन वाटप करण्यात आल्या आहेत़ कधी कनेक्टीव्हीटी तर कधी मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण नसल्याने सुरुवातीला बराच गोंधळ पाहावयास मिळाला़ तालुक्यात सध्या ७८ ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप केले जाते़ परंतु, ई-पॉस मशीनला केवळ १२ हजार ९०८ कार्डांचीच जोडणी करण्यात आली आहे़ गत महिन्यापासून पुरवठा विभागाने धान्याचा माल द्वारपोहच करण्यास सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे दुकानाचे जीपीएस लोकेशन पुरवठा विभागाकडून घेतले जात आहे़ गोदामातून निघालेला माल त्या गावातील दुकानदारापर्यंत जातो की नाही हे पाहण्यासाठी यंत्रणा अधिक सुकर झाली आहे़ 

१ लाख लाभार्थीस्वस्तधान्य योजनेसाठी प्राधान्य लाभार्थी योजनेत ७६ हजार १३७ लाभार्थी आहेत़ तर शेतकरी धान्य योजनेत २६ हजार ७२० लाभार्थी असून, अंत्योदय योजनेत ३ हजार ६१४ लाभार्थी आहेत़ असे १ लाख २ हजार ८५७ लाभार्थ्यांची संख्या तालुक्यामध्ये आहे़ गावा-गावांत अनेक कुटुंंबे वर्षानुवर्षे स्थलांतरित झाले आहेत़ या कुटुंबांच्या नावे स्वस्तधान्य दुकानाला माल मिळतो़ आता या सर्वेक्षणातून स्थलांतरित कुटुंबे वगळली जाणार आहेत़ त्याचबरोबर मयत  लाभार्थीही वगळले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़ 

सर्वेक्षण करण्यात येत आहे तलाठ्यामार्फत सर्वेक्षण मोहीम हाती घेऊन शिधापत्रिकांना आधार जोडणी केली जाणार आहे.  या अहवालानंतरच गॅस धारक आणि आधार जोडणीची स्पष्टता समारे येणार आहे़ - निलेश पळसकर, नायब तहसीलदार, पुरवठा

टॅग्स :parabhaniपरभणी