शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत तहसीलच्या स्टोर रूमला आग; विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळाले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 17:35 IST

सोमवारी रात्री बारा वाजेनंतर या खोल्यांना आग लागली.

परभणी : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पडीक अवस्थेत असलेल्या तीन खोल्यांमध्ये आग लागल्याची ही घटना सोमवारी (दि. १०) रात्री घडली. या आगीत २००४ च्या विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले आहे.

तहसील कार्यालयाच्या परिसरातच जुन्या बांधकामातील तीन खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये भंगार खुर्च्या, टेबल, कपाट आणि २००४ च्या निवडणुकीत वापरलेल्या पेट्या ठेवल्या होत्या. सोमवारी रात्री बारा वाजेनंतर या खोल्यांना आग लागली. दरम्यान, बघता-बघता ही आग वाढत गेली. पोलीस नियंत्रण कक्षातून अग्नीशमन दलाला रात्री २.११ वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाचे सचिन राठोड, मदन राठोड, वाहनचालक शेख मौला आदींनी घटनास्थळी दाखल होऊन दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान, जुन्या असलेल्या या तीनही खोल्यांमध्ये वीज प्रवाह नाही. या खोल्या वापरात नाहीत. असे असताना आग नेमकी लागली कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेत या खोल्यांमधील फर्निचर, कागदपत्र जळून खाक झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, या संदर्भात तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, या तीन खोल्यांमध्ये वीजप्रवाह नव्हता. त्यामुळे आग लागण्याचे कारणच नाही. घडलेली घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणी पंचनामा केला असून, त्यात २००४ च्या निवडणुकीतील वापरात नसलेले जुने कागदपत्र जळाले आहेत. या संदर्भात रितसर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगvidhan sabhaविधानसभा