शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण दिनी वनविभागाच्या रोप वाटिकेला आग

By admin | Updated: June 5, 2017 18:46 IST

येलदरी धरणाच्या पायथ्याशी वन विभागाने तयार केलेल्या रोप वाटिकेला ५ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आग लागली.

ऑनलाइन लोकमत
येलदरी (जि. परभणी ), दि. 5  - येलदरी धरणाच्या पायथ्याशी वन विभागाने तयार केलेल्या रोप वाटिकेला ५ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत शेकडो झाडे जळाली असून जागतिक पर्यावरण दिनीच लागलेल्या या आगीमुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
येलदरी धरणाच्या पायथ्याशी वनविभागाने रोपवाटिका तयार केली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रोप वाटिकेला आग लागली. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने आग वाढत गेली. पाहता पाहता संपूर्ण रोप वाटिकेत आग पसरली. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर गावकºयांनी रोप वाटिकेकडे धाव घेतली. मात्र आगीचे स्वरुप मोठे असल्याने  ही आग विझवता आली नाही. रोप वाटिेकेच्या ठिकाणी पाणी उपलब्ध होते. परंतु, वन विभागाचा कर्मचारी अथवा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळे पाणी असतानाही आग विझविण्यासाठी या पाण्याचा वापर करता आला नाही. परिणामी शेकडो झाडे आगीच्या भक्षस्थानी पडली. दरम्यान, गावकºयांनीच जिंतूर अग्नीशमन अधिकाºयांना माहिती दिली. त्यानंतर अग्नीशमनची गाडी दाखल झाली. एक तासांनी ही आग आटोक्यात आली. 
विशेष म्हणजे ५ जून रोजी सर्वत्र जागतिक पर्यावरणदिन साजरा केला जात आहे. मात्र याच दिवशी कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेली रोपवाटिका जळून खाक झाली. येलदरी येथील उपसरपंच प्रमोद चव्हाण यांनी वनविभागाच्या अधिकाºयांना फोन लावून आगीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु, अधिकाºयांनी फोनही उचलला नाही. रोपवाटिकेच्या शेजारीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, महावितरण व पाटबंधारे विभागाची वसाहत आहे. ही आग वेळीच आटोक्यात आल्याने अनर्थ टळला. 
दोन वर्षांपूर्वी लावली होती झाडे-
पाटबंधारे विभागाच्या ३ हेक्टर जमिनीवर वनविभागाने २०१५ मध्ये वृक्ष लागवड केली होती. या ठिकाणी ४ हजारहून अधिक झाडे लावण्यात आली. या झाडांसाठी ड्रीपची व्यवस्थाही करण्यात आली होती. झाडांची वाढ चांगली झाल्याने हा परिसर रमणीय झाला होता. मात्र वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांचे या रोपवाटिकेकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत वाढले. उन्हाळ्यात हे गवत वाळून गेल्याने आग पसरण्यास मदत झाली व रोपवाटिकेचे नुकसान झाले.