शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत संभाजी भिडे यांच्या सभेप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:22 IST

परभणी शहरातील महेंद्रनगर भागात तुळजाभवानी मंदिरासमोरील मैदानात ८ जानेवारी रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा घेण्यात आली होती.

ठळक मुद्दे या सभेला जवळपास २०० ते २५० नागरिकांची उपस्थती होती. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल

परभणी : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे शहराध्यक्ष शंकर देशमुख यांच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी सभा, मोर्चे, धरणे आंदोलने, निदर्शने आदी बाबींना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एका आदेशाद्वारे बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील महेंद्रनगर भागात तुळजाभवानी मंदिरासमोरील मैदानात ८ जानेवारी रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा घेण्यात आली होती. या सभेला जवळपास २०० ते २५० नागरिकांची उपस्थती होती. या सभेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असे वर्तन करण्यात आले, असा अरोप करून पोलीस कर्मचारी शिवाजी विठ्ठलराव टाकरस यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून या कार्यक्रमाचे आयोजक तथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे शहराध्यक्ष शंकर देशमुख यांच्यावर शनिवारी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

निदर्शने केल्याप्रकरणीही गुन्हा दाखलसंभाजी भिडे यांनी समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यास त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. या प्रकरणीही शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात रिपब्लिकन सेनेचे आशिष वाकोडे, प्रवीण कनकुटे, विश्वजीत वाघमारे, प्रवीण गायकवाड, संजय खिल्लारे, राहुल घटसावंत व इतर २ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीparabhaniपरभणी