शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परस्पर शेतजमीन नावावर केली; मंडळ अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 16:23 IST

Crime News Parabhani : तत्कालीन मंडळाधिकाऱ्यासोबत संगनमत करत जमीन बनावट दस्तावेज करून परस्पर नावावर करुन घेतली.

मानवत : तालुक्यातील पिंपळा शिवारातील गट क्रमांक 140 मधील दोन एकर शेत जमीन बनावट दस्तावेज तयार करून परस्पर नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी तत्कालीन मंडळाधिकाऱ्यासह दोघांवर मंगळवारी ( दि. 31 ) पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळा येथील रहिवासी महादेव नारायण सुरवसे यांचे आजोबा सिताराम निवृत्ती सुरवसे यांच्या मालकी व ताब्यात पिंपळा शिवारातील गट क्रमांक 140 मध्ये 2 हेक्टर 25 आर एवढी जमीन सन 1987 ते 2015 दरम्यानच्या सातबारा वर नमूद होती. आजोबा मयत झाल्यानंतर सदर गट नंबर मध्ये वारस पंडित सिताराम सुरवसे, गंगाधर सिताराम सुरवसे व महादेव यांचे वडील नारायण सुरवसे  यांची नावे वारसाने यावयास हवी होती. परंतु, सीताराम सुरवसे यांचे वारस गंगाधर सुरवसे, नारायण सुरवसे हे अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन गावातील विठ्ठल लक्ष्मण सुरवसे आणि अनंता विठ्ठल सुरवसे  यांनी तत्कालीन मंडळाधिकारी भरकडसोबत संगनमत करून गट क्रमांक 140 मधील जमीन बनावट दस्तावेज करून परस्पर नावावर करुन घेतली. या प्रकरणी महादेव नारायण सुरवसे यांच्या तक्रारी वरून विठ्ठल लक्ष्मण सुरवसे आणि अनंता विठ्ठल सुरवसे व तत्कालीन मंडळाधिकारी भरकड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी