शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात चौदा मंडळांत अतिवृष्टी; झिरो फाटा-पूर्णा वाहतूक बंद, अनेक गावे संपर्काबाहेर

By राजन मगरुळकर | Updated: July 13, 2022 18:59 IST

परभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा ते पूर्णा रस्त्याची वाहतूक बुधवारी सकाळपासून बंद झाली आहे.

-राजन मंगरुळकर परभणी : जिल्ह्यात बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे १४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये पूर्णा आणि पालम तालुक्यातील प्रत्येकी पाच मंडळांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात बुधवारी ५७.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे तीन दरवाजे उघडून ५२ हजार २१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. याशिवाय तालुक्यातील आरखेड जिल्हा परिषद शाळेची भिंत व शिरपूर येथील दोन घरे पडल्याची घटना घडली आहे. सोनपेठ तालुक्यातील फाल्गुनी नदीच्या पुराच्या पाण्यामुळे उक्कडगाव, वडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगापिंपरी, गोळेगाव या गावातील वाहतूक ठप्प पडली आहे. सेलू तालुक्यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडल्याने निम्न दुधना प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले असून, बुधवारी सायंकाळी पाच वाजता २३६७ क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सद्य:स्थितीत दुधना प्रकल्पात ७०.६२ टक्के जिवंत पाणीसाठा निर्माण झाला आहे.

झिरो फाटा-पूर्णा वाहतूक बंदपरभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा ते पूर्णा रस्त्याची वाहतूक बुधवारी सकाळपासून बंद झाली आहे. माटेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग सायंकाळपर्यंत बंद होता. तसेच पालम तालुक्यातील ३० गावांचा संपर्क तुटला होता. तर गंगाखेड तालुक्यातील दहा गावांचा संपर्क इंद्रायणी नदीच्या पुलावर पाणी आल्याने तुटला आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी