शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील २७ मंडळांत अतिवृष्टी; पावणेदोन लाख हेक्टरवरील पिके बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:00 IST

जिल्ह्यातील येलदरी आणि निम्न दुधना हे दोन मोठे प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत

ठळक मुद्दे येलदरी, निम्न दुधनासह सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लोपुराच्या पाण्यात वाहून दोघांचा मृत्यू

परभणी : जिल्ह्यात मंगळवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून, सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाथरी तालुक्यात सर्वाधिक १०६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गंगाखेड तालुक्यात १०० मिमी, पालम १०३ मिमी, सोनपेठ ६७.९, परभणी ६७.७ आणि मानवत तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात एकूण ५२ मंडळे असून, त्यापैकी २७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांना पूर आला असून, अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली आहेत. नदीकाठावरील पिकांचा आकडा मोठा आहे. जिल्ह्यातील येलदरी आणि निम्न दुधना हे दोन मोठे प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरले असून, येलदरी प्रकल्पाचे १० दरवाजे उघडले असून, निम्न दुधना प्रकल्पाच्या १६ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

पुराच्या पाण्यात वाहून दोघांचा मृत्यूमासोळी, करपरा या दोन मध्यम प्रकल्पांसह गोदावरी नदीवरील बंधारे १०० टक्के भरले आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार पुराच्या पाण्यात वाहून दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच लहान ७२ आणि मोठी १९ जनावरे दगावली आहेत. ग्रामीण भागातील १०६१ घरांची पडझड झाली आहे. पूरपरिस्थितीमुळे ४० ते ५५ गावांचा संपर्क सध्या तुटलेला आहे. गंगाखेड, पालम भागात प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणीagricultureशेती