शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबीच्या साह्याने खोदकाम; दाखविले मजुरांच्या नावावर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 18:51 IST

MANAREGA News विभागीय आयुक्तांनी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत सार्वजनिक विहीर खोदकाम करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले होते.

ठळक मुद्देशासकीय यंत्रणांनीच मजुरांना डावलले'मग्रारोहयो' योजनेच्या उद्देशाला हरताळ

- मारोती जुंबडे

परभणी :  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सार्वजनिक विहीर खोदण्याच्या कामासाठी जेसीबी मशीनचा वापर करुन त्यानंतर मजुरांच्या नावाने देयके सादर केल्याची चर्चा असून, याबाबत प्रशासकीय यंत्रणा मात्र चुप्पी साधून आहे.

ग्रामीण भागात उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत सार्वजनिक विहीर खोदकाम करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला दिले होते. या अंतर्गत ग्रामपंचायतींची निवड करुन विहिरींना मंजुरीही देण्यात आली. ही सर्व कामे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आली. त्यामुळे विहिरीचे खोदकाम मजुरांच्या साह्याने करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनानेच त्यास फाटा देऊन जेसीबी यंत्राच्या साह्याने विहीर खोदकाम केले. इथपर्यंत ठीक होते, मात्र कामे जेसीबीच्या साह्याने केल्यानंतर झालेल्या कामांच्या ठिकाणी मजुरांची नावे दाखविण्यात आली. जास्तीत जास्त मजुरांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने रोजगार हमी योजना राबविली जाते. मात्र वेळेत उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या घाईपोटी मजुरांचे जॉब कार्ड जोडले खरे मात्र कामे जेसीबीच्या साह्याने करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यामुळे मजुरांना मात्र काम उपलब्ध झाले नसल्याने योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला गेला आहे.या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

३३३ कामांवर ५ कोटी रुपयांचा खर्चसार्वजनिक विहीर खोदकाम करताना प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट निश्चित करुन दिले होते. त्यापैकी अनेक तालुक्यांनी कामे हाती घेतली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३३३ गावांत सार्वजनिक विहीर खोदण्याचे काम प्रगतीपथावर आहेत. त्यावर साधारणत: ५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.  त्यात गंगाखेड तालुक्यात २७ विहिरींच्या कामावर ४४ लाख ४७ हजार, जिंतूर तालुक्यात ७८ कामांवर १ कोटी १३ लाख ९७ हजार, मानवत तालुक्यात २९ विहिरींच्या कामावर ५८ लाख २२ हजार, पालम तालुक्यात २७ विहिरींच्या कामावर ३० लाख २४ हजार, परभणी तालुक्यातील ४७ विहिरींच्या कामावर १ कोटी ४ लाख ४ हजार, पाथरी तालुक्यातील २१ विहिरींच्या कामावर १७ लाख १९ हजार, पूर्णा तालुक्यातील ५४ कामांवर ६१ लाख ३६ हजार, सेलू तालुक्यातील २६ विहिरींच्या कामावर ५० लाख ८३ हजार तर सोनपेठ तालुक्यातील २४ विहिरींच्या कामावर आतापर्यंत २६ लाख ६४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश कामे मशीनच्या साह्याने झाली आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी