शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरातील घटना : नगरसेवक रोडे यांच्या खूनानंतर बाजारपेठ झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:04 IST

येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा खून झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर विविध भागातील व्यापारी प्रतिष्ठाने स्वत:हून व्यापाऱ्यांनी रविवारी बंद केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा खून झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर विविध भागातील व्यापारी प्रतिष्ठाने स्वत:हून व्यापाऱ्यांनी रविवारी बंद केली़शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा जायकवाडी वसाहत परिसरात रविवारी खून झाला़ सकाळी १० च्या सुमारास या बाबतची माहिती वाºयासारखी शहरात पसरली़ त्यानंतर उघडण्यात आलेली खानापूर फाटा, सुपरमार्केट, वांगी रोड, सरकारी दवाखाना परिसर, सुभाष रोड आदी भागातील व्यापारी प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंद केली़ अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ पोलिसांनी घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला़ यावेळी जिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती़ जवळपास ३ वाजेपर्यंत येथील गर्दी कायम होती़ यावेळी उपस्थितांनी जोपर्यंत आरोपींना ताब्यात दिले जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेतली़ त्यामुळे पोलिसांची धावपळ सुरू झाली़ शहर पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी, पोलीस उपअधीक्षक तृप्ती जाधव यांनी उपस्थितांची समजूत काढली़आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना नियमानुसार तपासांती कठोर शासन केले जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले़ यावेळी उपस्थित जनसमुदायाने आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी घोषणाबाजी सुरू केली़ त्यानंतर पोलिसांनी जमावाला शांत केले़त्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास मयत अमरदीप रोडे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला़ दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी चोख बंदोबस्त लावला होता़

टॅग्स :parabhaniपरभणीMurderखूनCrime Newsगुन्हेगारी