शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील २५८ शेतकर्‍यांना एक वर्ष उलटले तरीही मिळेना सोयाबीनचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 18:54 IST

शहरातील एमआयडीसी परिसरातील आयटीसी केंद्राने सोयाबीन खरेदी केलेल्या २५८ शेतकर्‍यांना एक वर्ष उलटले तरीही सोयाबीनचे अनुदान अद्याप दिलेले नाही.

- मारोती जुंबडे 

परभणी : शहरातील एमआयडीसी परिसरातील आयटीसी केंद्राने सोयाबीन खरेदी केलेल्या २५८ शेतकर्‍यांना एक वर्ष उलटले तरीही सोयाबीनचे अनुदान अद्याप दिलेले नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

खरीप २०१६ च्या हंगामामध्ये शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले होते. त्यानंतर शेतकर्‍यांनी सोयाबीनचे झालेले उत्पादन बाजार पेठेत विक्रीसाठी आणले; परंतु, विक्रमी झालेल्या उत्पादनाचा फायदा घेण्यासाठी व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या सोयाबीनची कवडीमोल दराने खरेदी सुरू केली़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनही सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला़ या पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. 

१ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोयाबीन विक्री केलेल्या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २०० रुपये या प्रमाणे जास्तीत जास्त २५ क्विंटल प्रती शेतकरी अनुदान मंजूर केले़ त्यानंतर राज्य शासनाने पुन्हा दुसरा शासन निर्णय काढून ज्या शेतकर्‍यांनी आयटीसी सेंटरकडे सोयाबीन विक्री केले आहे़, त्या शेतकर्‍यांनी प्रस्ताव सोयाबीन अनुदानासाठी दाखल करावेत, असे आवाहन केले़ त्यानुसार जिल्ह्यातील २५८ शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या अनुदानासाठी आपले प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समिती व आयटीसी केंद्राकडे दाखल केले़ जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे दाखल झालेले जवळपास १५ हजार प्रस्ताव पणन मंडळ संचालनालयाकडून मंजूर करून ५ कोटी रुपयांचे अनुदानही जिल्ह्याला मिळाले़ त्याचे वाटपही झाले;परंतु, आयटीसी केंद्राकडे दाखल केलेल्या २५८ शेतकर्‍यांना १ वर्ष उलटले तरीही सोयाबीनचे अनुदान मिळालेले नाही़ त्यामुळे हे शेतकरी अनुदान मिळविण्यासाठी आयटीसी व कृषी उत्पन्न बाजार समितीकडे चकरा मारत आहेत़ त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन सोयाबीन उत्पादकांच्या अनुदानाचा पाठपुरावा करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे़ 

शेतकर्‍यांचे प्रस्ताव गेले तरी कुठे?परभणी शहरातील एमआयडीसी परिसरातील आयटीसी केंद्राकडे सोयाबीन विक्री केलेल्या २५८ शेतकर्‍यांनी आपले प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे दाखल केले होते़ मात्र या शेतकर्‍यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही़ या अर्जांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व आयटीसी केंद्राचे दिलीप कोलते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आम्ही प्राप्त अर्ज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दाखल केले आहेत़, असे सांगितले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्याकडे प्राप्त झालेले अर्ज आम्ही तालुका सहायक निबंधक कार्यालयाकडे सादर केले आहेत, असे सांगितले. त्यानंतर सहायक निबंधक कार्यालयाचे निबंधक पांडुरंग राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या कार्यालयाकडे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून शेतकर्‍यांच्या अनुदानासंबंधी कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही, असे सांगितले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक २५८ शेतकर्‍यांनी दाखल केलेले अनुदानाचे प्रस्ताव गेले तरी कुठे ? असा प्रश्न शेतकर्‍यांमधून उपस्थित होत आहे़ 

आयटीसीकडून पाठपुरावा नाहीशहरातील एमआयडीसी परिसरातील आयटीसी केंद्राकडे अनुदानासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांचे एक वर्ष उलटले तरीही शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही़ याबाबत आयटीसीकडून पाठपुरावा झाला नाही़ 

प्रशासनात समन्वय नाहीजिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झालेले अर्ज सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पाठविले की नाही यावरून दोन्ही विभागातील अधिकार्‍यांमध्ये समन्वय दिसून आला नाही़ त्यामुळे शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही़ 

‘जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करावी’२५८ शेतकर्‍यांना एक वर्ष उलटले तरीही सोयाबीनचे अनुदान मिळालेले नाही़ त्यामुळे या प्रकरणाची जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी स्वत: लक्ष घालून चौकशी करावी, अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांतून होत आहे़ 

आम्हाला अनुदान द्यावे़कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्रस्ताव दाखल केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना त्यांचे अनुदान मिळाले आहे़ परंतु, आयटीसी केंद्राकडे अनुदानासाठी अर्ज दाखल केलेल्या शेतकर्‍यांना एक वर्ष उलटले तरीही अनुदान मिळाले नाही़ याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती, आयटीसी केंद्र यांच्याकडे अनुदानासंबंधी विचारणा केली असता टोलवा टोलवीची उत्तरे मिळत आहेत़ त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून आम्हाला अनुदान द्यावे़-विलास भोसले, शेतकरी, सिरकळस

प्रस्ताव प्राप्त झालेले नाहीत़कृषी उत्पन्न बाजार समिती व आयटीसी सेंटरकडून प्राप्त झालेले प्रस्ताव शहानिशा करण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत़ मात्र या कार्यालयाकडून अद्यापही प्रस्ताव आम्हाला प्राप्त झालेले नाहीत़ -गणेश पुरी, उपनिबंधक

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी