शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा रुग्णालयातील औषधींचा तुटवडा संपेना; रुग्णांना बसत आहे आर्थिक झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:53 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचा गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर रुग्णांना बाहेरुन औषधी खरेदी करावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचा गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर रुग्णांना बाहेरुन औषधी खरेदी करावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात ग्रामीण भागातील हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. या रुग्णांवर उपचार केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडूनच औषधींचा पुरवठा केला जातो. मात्र दोन ते तीन महिन्यांपासून रुग्णालयामध्ये औषधींचा तुटवडा जाणवत आहे. तसेच सध्या काही दिवसांपासून सलाईनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार केल्यानंतर आवश्यक ती औषधी लिहून देताना डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या  रुग्णांना अ‍ॅन्टीबायोटिक औषधी द्यावी लागते. मात्र याच औषधींचा सध्या रुग्णालजात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सर्रास बाहेरुन औषधी विकत घ्यावी लागत आहे. काही सामाजिक संस्थांनी रुग्णालय प्रशासनाला तुटवडा जाणवत असल्याने अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचा पुरवठा केला होता. परंतु, तो ही अपुरा पडला. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधी उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी रुग्णांतून होत आहे.

सीटी स्कॅनही बाहेरूनच येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास तीन वर्षापासून सीटी स्कॅन मशीन उपलब्ध नाही. जी मशीन कार्यरत होती. तीचे आयुष्य संपल्यामुळे ती नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे हलविण्यात आली आहे. मात्र त्या जागी अद्यापपर्यंत दुसरी मशीन कार्यान्वित करण्यात आली नाही. परिणामी जिल्हा सामान्य रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना तीन वर्षापासून सीटी स्कॅन बाहेरुन करुन आणावा लागत आहे. यासाठी मोठी आर्थिक झळही रुग्णांना बसत आहे. परंतु, यावर केवळ पत्रव्यवहार चालू आहे. ठोस पर्याय निघत नाही. त्यामुळे याकडे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सीटी स्कॅनमशीनसाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांमधून होत आहे.

एक्स-रे मशीनवर भारजिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीन ही कमी क्षमतेची असल्यामुळे अनेक रुग्णांना एक्स-रे काढताना अडचणी येत आहेत़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलparabhaniपरभणीmedicineऔषधं