श्री शिवाजी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाच्यावतीने ऑनलाईन पद्धतीने आयोजित प्राध्यापक प्रेरणा कार्यशाळेच्या समारोपीय सत्रात मोरे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी, डॉ. विजया नांदापूरकर, डॉ. रोहिदास नितोंडे, विजय मोरे आदींची उपस्थिती होती.
डॉ. मोरे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षिणक धाेरण २०२० नुसार येत्या १५ वर्षांत देशातील सर्व वरिष्ठ महाविद्यालये अनिवार्य पद्धतीने स्वायत्त होणार आहेत. त्याचा काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षण संस्थांवरही होईल. त्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी आजपासूनच बदल करून घेणे आवश्यक आहे.
काळासोबत कौशल्याधिष्ठीत आणि मानवीय मूल्य रुजविणारे अभ्यासक्रम तयार होणे आवश्यक आहे. जेणेकरून काळाच्या ओघात येऊ घातलेल्या परदेशी विद्यापीठांशी आपण स्पर्धा करू शकू, असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी येणाऱ्या काळातील शिक्षण क्षेत्रातील संभाव्य धोक्यांकडे लक्ष केंद्रीत केले. ते म्हणाले. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती आणि समाजाचा एकत्रित विकास व्हावा, जेणेकरून देशाचा विकास होईल. त्यासाठी शिक्षक या नात्याने आपणास आव्हाने पेलण्यासाठी ज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल, असे ते म्हणाले. डॉ. रोहिदास नितोंडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जयंत बोबडे यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. डॉ. गणेश चालिंदरवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शरद कम यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. रामदास टेकाळे, डॉ. सुरेंद्र येनोरकर, डॉ. सबिहा सय्यद, डॉ. सचिन येवले, डॉ. उत्कर्ष किट्टेकर, डॉ. विजय कलमसे आदींनी प्रयत्न केले.