शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इमारत बांधकाम नावाखाली कर्मचाऱ्यांची शिक्षण संस्थेकडून ४७ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:57 IST

जिंतूरच्या विश्वकर्मा निवासी अस्थिव्यंग शाळेतील प्रकार; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा

जिंतूर : संस्थेच्या इमारत बांधकामासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून ४६ लाख ७० हजार रुपये घेऊन इमारत न बांधता फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दीप शिक्षणसंस्था नांदेडचे अध्यक्ष नारायण देवराव पवार यांनी फिर्याद दिली. आरोपी उत्तम गंगाधर कुंटूरकर व कल्पना नामदेव कोटूरवार या दोघांनी जुन्या स्टॅम्पचा वापर करून कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देऊन काही कर्मचाऱ्यांकडून मोठ्या रकमा उकळल्या. या रकमा सन २०१७ ते २०२१ या पर्यंतच्या थकीत वेतनाच्या असून, थकीत वेतन आल्याचे समजल्यानंतर कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन इमारत बांधकामाच्या नावाखाली या रकमा उकळण्यात आल्या. या संदर्भामध्ये संबंधित संस्थेचे सध्याचे अध्यक्ष नारायण पवार यांनी फिर्याद दिली. 

विशेष म्हणजे उत्तम कुंटूरकर हे संस्थेचे केवळ सदस्य असून, त्यांच्या पत्नी कल्पना पवार या सन १९९८ मध्ये संस्थेच्या उपाध्यक्ष होत्या. त्यानंतर सन २०११ मध्ये ही सर्व कार्यकारिणी बदलण्यात आली होती. परंतु, जुन्या असणाऱ्या पदांचा लेटर पॅड व शिक्के वापरून कर्मचाऱ्यांना या नियुक्त्या दिल्या होत्या. विशेष म्हणजे, मागील अनेक दिवसांपासून ही संस्था वादाच्या भोवऱ्यात आहे. संस्थेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात किंवा नाही हेही संशयास्पद प्रकार आहे.

अशा उकळल्या रकमाराधा भगवान जाधव (कलाशिक्षिका) यांच्याकडून १२ लाख ६० हजार रुपये, शेख सादिक शेख गुलाम (विषय शिक्षक) यांच्याकडून ११ लाख ६० हजार रुपये, पठाण मुजाहिद खान जाफरखान (लिपिक) ६० हजार रुपये, शबाना बाबर पठाण (स्वयंपाकीण) ५ लाख ५० हजार, शेख रफिक शेख रजका (मोलकरीण) ६ लाख रुपये, सय्यद अरेफोदिन नसिरुद्दीन (शिपाई) ४ लाख ९० हजार, सांडू दगडू मगरे ५ लाख ५० हजार असे एकूण ४६ लाख ७० हजार रुपये उकळले.

टॅग्स :parabhaniपरभणीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी