सेलू : येथील मराठा सेवा संघ आणि शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन २१ फेब्रुवारी रोजी शहरातील एकलव्य प्राथमिक शाळेच्या सभागृहात सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील सातवी ते दहावी वर्गातील एका शाळेतील दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत ' मी अंश जिजाऊ सावित्रीचा , छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना , छत्रपती शिवाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन व मी छत्रपती शिवरायांचा वारसदार ' या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर विद्यार्थी पाच मिनिटांत आपले वक्तृत्व सादर करू शकतील. वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १५०० , द्वितीय क्रमांक १ हजार रुपये , तृतीय क्रमांक ७०० रुपये तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिक ३०० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्पर्धेचे उद्घाटन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध विचारवंत प्रा. विठ्ठल भुसारे यांच्या हस्ते होणार आहे.
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST