शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: ४० फुट उंच कमानीवर चढून युवकाचा गोंधळ, नंतर घेतली उडी; पोलिसांची तारांबळ

By राजन मगरुळकर | Updated: July 25, 2022 18:57 IST

वसमत महामार्गावरील प्रकार : परभणीत पोलीस, अग्निशमन दलाच्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे बचावला

परभणी :

परभणीच्या वसमत मार्गावरील एका स्वागत कमानीवर एक युवकानं चढून गदारोळ घातल्याची घटना घडली. युवक चक्क ३० ते ४० फूट उंच कमानीवर चढून गोंधळ घालत होता. युवकाच्या गोंधळाने पोलीस यंत्रणेची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती. हा सर्व प्रकार वसमत राष्ट्रीय महामार्गावर एमआयडीसी परिसरात सोमवारी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान  घडला आहे. 

शहरात दाखल होणाऱ्या रस्त्यावर वसमत महामार्ग कमानीवर चढून एका युवकाने अर्धा तास गोंधळ घातला. युवकाच्या या गोंधळामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. अखेर अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युवकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकाने ३० ते ४० फूट उंच कमानीवरून उडी मारली. कोणतेही कारण नसताना आणि काही मागणी सुद्धा नसताना युवकाने केलेल्या या प्रकारामुळे पोलीस, अग्निशमन तसेच उपस्थितही गोंधळात पडले होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदिपान शेळके, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे यांच्यासह २० ते २५ पोलीस आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. 

वसमत महामार्ग झाला जाम शहरातील खानापूर फाटा, शासकीय विश्रामगृह, एमआयडीसी या परिसरात असलेल्या बांधकाम विभागाच्या महामार्गावरील कमानीवर हा युवक सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास वर चढला होता. त्याने अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ घातला. या गोंधळात महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरलया युवकाच्या गोंधळाचे व्हिडिओ काढून समाज माध्यमावर व्हायरल केले जात होते. त्यामुळे ही चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची गर्दी महामार्गावर झाली. परिणामी, पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन राखत महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला.

ओळख न पटल्याने नेले ठाण्यातघटनेतील युवकाची ओळख न पटल्याने संबंधितास घटनास्थळावरून पोलीस ठाण्यात नेले. संबंधितास नवा मोंढा ठाण्यात दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांनी दिली. युवकाची ओळख पटल्यानंतर त्याचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि युवक मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  युवक भोळसर असून तो सेलू तालुक्यातील रहिवासी आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीEknath Shindeएकनाथ शिंदे