शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीतून सर्वसामान्यांची आर्थिक लूटच;परभणीकरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 10:23 IST

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ करुन शासन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत असून या माध्यमातून आर्थिक लुट केली जात आहे, असा आरोप ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात नागरिकांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ करुन शासन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत असून या माध्यमातून आर्थिक लुट केली जात आहे, असा आरोप ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात नागरिकांनी केला.केंद्र शासनाने वर्षभरात अनेक वेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढविले आहेत. सातत्याने होणाºया दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मंगळवारी याविषयी ‘लोकमत’ने सर्व्हेक्षण केले. पेट्रोल दरवाढीतून आर्थिक लूट केली जात आहे का? या प्रश्नावर ९२ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले. ३ टक्के नागरिकांनी नाही असे उत्तर दिले तर ५ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले. सत्तेत आल्यानंतर पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर ठेवू, असे आश्वासन भाजपाने निवडणुकीपूर्वी दिले होते. तेव्हा या दरवाढीतून भाजपने दिलेले आश्वासन फोल ठरले आहे का? या प्रश्नावर ८५ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले. ५ टक्के नागरिकांनी नाही, असे उत्तर दिले. तर १० टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले.कच्च्या तेलाचे भाव वाढले नसतानाही दरवाढ करणे योग्य आहे का? या प्रश्नावर ८८ टक्के नागरिकांनी नाही असे उत्तर दिले. ७ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले. तर ५ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे मत मांडले. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर राज्यशासनही वेगळा कर लावत आहे. त्यामुळे इंधनाच्या किंमती गगनाला भिडत असून राज्य शासनाकडून हा कर लावणे योग्य ठरते का? असा प्रश्न विचारला तेव्हा ७५ टक्के नागरिकांनी राज्य शासनाच्या कराला विरोध केला. तर १७ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर देऊन शासनाच्या धोरणाचे समर्थन केले. ८ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले.देशभरातील सर्व कर रद्द करुन जीएसटी हा एकच कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव सारखेच असायला हवे. मात्र प्रत्येक राज्यात हे भाव वेगवेगळे असून केंद्र शासन यातून सर्वसामान्यांची दिशाभूल करीत आहे का? या प्रश्नावर ९३ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले. ७ टक्के नागरिकांना मात्र शासन दिशाभूल करीत नसल्याचे मत नोंदविले.