शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्प प्रतिसाद असल्याचे कारण देत जिल्हास्तरावरील शासकीय अध्यापक विद्यालयातील प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:06 IST

 घटत्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे शासकीय अध्यापक विद्यालयांचे (डी.एल.एड.) प्रथम वर्षाचे प्रवेश चालू वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

- चंद्रमुनी बलखंडे

परभणी :  घटत्या विद्यार्थी संख्येमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे शासकीय अध्यापक विद्यालयांचे (डी.एल.एड.) प्रथम वर्षाचे प्रवेश चालू वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे शेवटची घटका मोजणाऱ्या खाजगी अध्यापक विद्यालयांमध्ये अधिकचे विद्यार्थी देण्याचा मार्ग शासनानेच मोकळा करून दिला आहे. 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यस्तरावर ४ जूनपासून डी.एल.एड. च्या प्रथम वर्षासाठी आॅनलाईन पद्धतीने शासकीय कोट्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेशासाठीची २० जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती; परंतु, अर्ज सादर करण्यास विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ३० जून पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभरात जिल्हास्तरावरील शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या शासकीय अध्यापक विद्यालयातही आतापर्यंत डी.एल.एड. साठी प्रवेश देण्यात येत होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून या अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे एनसीईआरटीच्या पत्रानुसार यावर्षीपासून जिल्हास्तरावरील शासकीय अध्यापक विद्यालयातील प्रथम वर्षासाठी प्रवेश बंद करण्यात आले आहेत.

परभणी येथील शासकीय अध्यापक विद्यालयामध्ये प्रथम वर्ष प्रवेशाची  क्षमता १०० होती. २०१६-१७ या आर्थिक वर्षात या विद्यालयात फक्त २१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २०१७-१८ या आर्थिक वर्षात फक्त ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गतवर्षी जिल्ह्यात खाजगी व शासकीय अध्यापक विद्यालयांमध्ये एकूण १ हजार ८०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असताना फक्त ३०० विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षास प्रवेश घेतला. अन्य जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय अध्यापक विद्यालयांचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे यावर्षीपासून प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरावरून घेण्यात आला आहे.  

तीन विद्यालय बंद; तीनचा शासनाकडे प्रस्तावजिल्ह्यात एकूण २४ अध्यापक विद्यालये आहेत. त्यातील २ अध्यापक विद्यालयाचे प्रवेश बंद आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील तीन अध्यापक विद्यालये बंद झाली आहेत. शिवाय अन्य तीन अध्यापक विद्यालयांनी प्रवेश बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव एनसीईआरटीकडे पाठविले आहेत. 

टॅग्स :Teacherशिक्षकcollegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्रState Governmentराज्य सरकार