शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल नसल्याने परभणीत घंटागाड्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:20 IST

शहरातील प्रभाग क्रमांक अ मधील घंटागाड्यांना डिझेल नसल्याने जवळपास २२ घंटागाड्या सोमवारी बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील प्रभाग क्रमांक अ मधील घंटागाड्यांना डिझेल नसल्याने जवळपास २२ घंटागाड्या सोमवारी बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे.परभणी शहरातील कचरा उचलण्यासाठी प्रभाग समिती अ, ब व क अंतर्गत घंटागाड्या मनपाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. तिन्ही समित्यांतर्गत कार्यरत असलेल्या या घंटागाड्यांना डिझेल मात्र वेगवेगळ्या पेट्रोलपंपावरुन दिले जाते. प्रभाग समिती अ अंतर्गत कार्यरत असलेल्या २२ घंटागाड्यांना जिंतूररोडवरील पेट्रोलपंपावरुन डिझेल दिले जाते. सोमवारी या २२ घंटागाड्यांना डिझेलच मिळाले नाही. त्यामुळे या घंटागाड्या दिवसभर जागेवर थांबल्या होत्या. या संदर्भात मनपाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पेट्रोलपंपावरील एका कर्मचाºयाच्या नातेवाईकाचे निधन झाल्याने सकाळी पेट्रोलपंप बंद होता. त्यामुळे डिझेल मिळाले नाही, असे सांगण्यात आले. वसमत रस्त्यावरील पेट्रोलपंपावरुन पेट्रोल टाकणे परवडणारे नाही, कारण एका घंटागाडीला दोन लिटर डिझेल दिले जाते.वसमतरोडवरुन डिझेल घेतल्यास त्या पेट्रोलपंपावरुन डिझेल भरलेली घंटागाडी प्रभाग समिती अ मध्ये येईपर्यंत जवळपास १ लिटर डिझेल लागते. त्यामुळे आर्थिक फटका बसतो. म्हणून वसमतरोडवरील पेट्रोलपंपावरुन डिझेल घेण्यात आले नाही, असेही मनपाच्या प्रभाग समिती अ मधील अधिकाºयांनी सांगितले.दुसरीकडे काही पदाधिकाºयांनी मात्र मनपाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे मनपाकडे डिझेल भरण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. सोमवारी पैशांची तजबीज झाली नाही. त्यामुळे या घंटागाड्या जागेवरच होत्या, असे सांगण्यात आले. त्यामुळे खरी परिस्थिती काय आहे, हे मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनाच माहीत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न