कोरेानाची साखळी खंडित करण्यासाठी १७ ते २३ एप्रिल या काळात वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनांना निर्बंध घातले आहेत. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, असे निर्देश दिले आहेत. असे असताना जिल्हाभरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. हे गांभीर्य लक्षात घेऊन परभणी पोलीस दलाने शहरासह जिल्हाभरात बंदोबस्त वाढविला आहे. विशेष म्हणजे बंदोबस्त व्यवस्थापन कारवाईला गती आणण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच परवानगी नसताना आस्थापना सुरू ठेवल्यास अशा व्यावसायिकांवरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
नियम मोडणाऱ्यांवर आता ड्रोनची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST